केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी थेट तिरंगा ध्वज असलेला केक कापला आहे. ज्या तिरंग्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, भारतीय जवान ज्याच्यासाठीवसीमेवर रक्त सांडतात, तो तिरंगा असलेला केक कापताना तुम्हाला लाज वाटत नाही. हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे!
काँग्रेसचे नेते दिवसभर राष्ट्रभक्तीच्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे त्यांच्याच हातून तिरंग्याचा केक कापला जातो. काँग्रेसची ही दुटप्पी राष्ट्रभक्ती आता देशासमोर आली आहे. तिरंगा हा तुमच्या राजकीय कार्यक्रमाच्या सजावटीचा भाग नाही. तो भारताच्या अस्मितेचा आणि प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचं प्रतीक आहे!
चेन्नीथला आणि कॉंग्रेसची ही कृती देशविरोधी आहे. तिरंग्याचा अवमान करणाऱ्या काँग्रेसला देश राष्ट्रभक्तीचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही!