हैडलाइन

नवी मुंबई महापालिका कामगारांच्या प्रश्नांवर मनसेचा आक्रमक पवित्रा; संदीप देशपांडे यांचा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता देण्याचा ठराव करून दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही हा भत्ता कामगारांच्या खात्यात कधी जमा होणार, याबाबत प्रशासनाकडून ठोस उत्तर दिले जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मनसे नेते तथा मनसे पालिका कामगार सेना अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाला इशारा देत, एका महिन्याच्या आत कामगारांना ७५०० रुपयांचा भत्ता मिळण्यास सुरुवात झाली नाही, तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करून प्रशासनाला पैसे देण्यास भाग पाडू, असे स्पष्ट केले.


तसेच विद्युत विभागातील कामगारांची वर्गवारी आणि थकीत एरियर्सचा प्रश्नही येत्या १० दिवसांत मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. हा प्रश्न सोडवण्यात प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

यासोबतच महापालिका कामगारांना आरोग्य विमा देण्यात यावा, अशी ठाम भूमिका मनसे पालिका कामगार सेनेच्या वतीने मांडण्यात आली.

दरम्यान, वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील अनेक कामगारांनी राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी रुग्णालयात मनसे पालिका कामगार सेनेच्या युनिटची स्थापना करण्यात आली. या युनिटचे उद्घाटन मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी मनसे पालिका कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, सागर विचारे, अभिलेश दंडवते, अक्षय भोसले यांच्यासह मनसे पालिका कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

बिग बॉस फेम डोनल बिष्ट की...

चेम्बूर जिमखाना ने क्रिकेट होम टूर्नामेंट 2026 की ऑफिशयल घोषणा कर दी है....

ज्ञानेश कुमार राजीनामा द्या,...

ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा जो भ्रष्ट कारभार सुरू...

MLA सना मलिक शेख की पहल पर भव्य...

युवाओं के रोजगार और बेहतर भविष्य को ध्यान में रखते हुए, MLA सना मलिक शेख की ओर...

आदिवासी समाजाच्या वतीने नवी...

 आदिवासी समाज, नवी मुंबई यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुंडण आंदोलन...

सारण आणि मिठी नदी...

बृहन्मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुंबई के सायन कोळीवाडा में विधायक कैप्टन तमिल सेलवन आयोजित नवरात्री...