हैडलाइन

पत्रकारांच्या आरोग्याचीही ‘ब्रेकिंग’ काळजी; विधानभवनात विशेष आरोग्य शिबिर

दिवसरात्र बातम्यांच्या शोधात धावणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचीही आता काळजी घेतली जात आहे. पत्रकारांच्या आरोग्याला प्राधान्य देत मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवनात विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसभापती सचिन अहिरे यांचीही उपस्थिती होती.

या आरोग्य शिबिरात पत्रकारांची दंत व नेत्र तपासणी, तसेच विविध प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यासोबतच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे वेळेवर निदान व्हावे, यासाठी आवश्यक तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.


पत्रकारांचे अनियमित वेळापत्रक, सततची धावपळ आणि कामाचा ताण लक्षात घेता आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या शिबिराला पत्रकारांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये मोफत आरोग्य...

चेंबूरमध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले....

पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या...

नवी मुंबईतील लालपाडा येथे साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव...

गोविंदांचा थरार, कलाकारांचा...

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात शिवसेना प्रणित सुनील चोगुले स्पोर्ट्स...

लोकनेते आदरणीय गणेश नाईक...

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...

पत्रकारांच्या आरोग्याचीही...

दिवसरात्र बातम्यांच्या शोधात धावणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचीही आता...

नेपाळमध्ये अडकलेले 54 भारतीय...

नेपाळमधील महापुरामुळे चीन- नेपाळ सीमेवर अडकून पडलेले 54 भारतीय भाविक अखेर...