हैडलाइन

गोविंदांचा थरार, कलाकारांचा जलवा अन् एकनाथ शिंदेंची उपस्थिती; विजय चोगुले यांची दहीहंडी ठरली खास

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात शिवसेना प्रणित सुनील चोगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

शिवसेना उपनेते आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते . विजय चोगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाला गोविंदा पथकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


या उत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे तब्बल ११ लाख ११ हजार १११ रुपयांची पारितोषिके. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली.

दरम्यान, या उत्सवात अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुशांत शेलार आणि अभिनेत्री श्रुती मराठे या कलाकारांनी येऊन गोविंदाचा उत्साह वाढवला.

 तसेच अनेक नामांकित कलाकारांनी आपल्या अप्रतिम परफॉर्मन्सने उपस्थितांचं मनोरंजन केलं. त्यांच्या दमदार सादरीकरणामुळे दहीहंडीच्या उत्साहात आणखी रंगत भरली.


विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांनी सर्व गोविंदांचं कौतुक करत त्यांच्या उत्साहाला दाद दिली.

ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा जल्लोष, कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे ऐरोलीतील हा दहीहंडी उत्सव चांगलाच पार पडला.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये मोफत आरोग्य...

चेंबूरमध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले....

पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या...

नवी मुंबईतील लालपाडा येथे साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव...

गोविंदांचा थरार, कलाकारांचा...

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात शिवसेना प्रणित सुनील चोगुले स्पोर्ट्स...

लोकनेते आदरणीय गणेश नाईक...

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...

नेपाळमध्ये अडकलेले 54 भारतीय...

नेपाळमधील महापुरामुळे चीन- नेपाळ सीमेवर अडकून पडलेले 54 भारतीय भाविक अखेर...

पत्रकारांच्या आरोग्याचीही...

दिवसरात्र बातम्यांच्या शोधात धावणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचीही आता...