आरोपीच्या विरोधात दोघां मुलांनी साक्ष दिल्याने न्यायालयाने आरोपीला ठोठावली जन्मठेपची शिक्षा!

मुलांचे सर्वत्र कौतुक!

चेंबूर परिसरात प्रेयसीचे तुकडे करून हत्या करणाऱ्या आरोपीच्या विरोधात दोघां मुलांनी साक्ष दिल्याने न्यायालयाने आरोपीला जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे.

मुकेश खवळे व अतिष काळे अशी न्यायालयात साक्ष देण्याऱ्या  दोघा मुलांची नांवे आहेत. तर

प्रभाकर शेट्टी वय - 33 अशा या जन्मठेपची शिक्षा लागलेल्या आरोपीचे नांव आहे. 

 आरोपी हा चेंबूर परिसरातील सुभाष नगर येथे राहत होता. 

मुंबई, ( स्वानंदी तांबे  ) : त्याचे कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका महिले बरोबर त्याचे अनैतिक  प्रेमसबंध होते. त्यामुळे या महिलेने प्रभाकरकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र याच दरम्यान प्रभाकर याचे त्याच्या कुटुंबियांनी लग्न ठरवले होते. त्यामुळे त्याने प्रेयसीला ठार मारण्याचा निर्णय त्याने घेऊन ता.29 डिसेंम्बर 2013 रोजी आरोपीने शारीरिक सम्बध करण्याच्या बहाण्याने  घरी बोलावून धारदार व सुरीने तिचा गळा कापून हात पाय व मुंडके असे धडा पासून वेगळे करून खून केला तसेच महिलेचे हात पाय बॉम्बे जेटी येथील खाडीमध्ये मुंडके व चेंबूर शेल कॉलनी जवळील साईबाबा नगर येथील नाल्यात धड तर गणेश घाट चेंबूर येथील गणेश घाट या ठिकाणी टाकून दिले

जेव्हा मृत्यू महिलेचा मृत्यूदेहाचा काही भाग गणेश घाट चेंबूर या ठिकाणी विल्हे वाट लावत असताना सदर  ठिकाणी असणाऱ्या दोन मुलांची त्याने मदत मागितली तेव्हा या दोन मुलांना आरोपी बद्दल  संशय आला त्यांनी या गुन्ह्यात समय सुचकता दाखवून या मुलांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच आरोपीच्या विरोधात न्यायालयात साक्ष दिली. त्यामुळे आरोपीला जन्म ठेप शिक्षा सिद्ध होण्यास  महत्वपूर्ण ठरली आणि न्यायालयाने आरोपीला जन्म ठेप शिक्षा ठोठावली.

या मुलांच्या धाडसी व प्रसंशनिय कामगिरी बद्दल मुकेश खवळे व अतिष काळे या दोघांना पोलीस आयुक्त मुंबई परमबीर सिंह पोलीस सह आयुक्त ( कावसु ) विश्वास नागरे पाटील यांनी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले. या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Most Popular News of this Week

प्रकाश अंबेडकर के प्रस्ताव पर...

प्रकाश अंबेडकर के प्रस्ताव पर कांग्रेस एक कदम आगे, पवार और ठाकरे अंबेडकर का...

होली मनाने गांव जाने वाले...

होली मनाने गांव जाने वाले यात्रियों की दिखी भीड़,नवी मुंबई। होली और रंगपंचमी...

हापुस के नाम पर ग्राहकों के...

हापुस के नाम पर ग्राहकों के साथ लूट, कार्यवाई की मांगनवी मुंबई। वाशी स्थित...

मनपा एंव विसपुते कॉलेज के...

मनपा एंव विसपुते कॉलेज के संयुक्त सहयोग से अपशिष्ट से टिकाऊ...

देशी पिस्टल बेचने के साथ...

देशी पिस्टल बेचने के साथ गिरफ्तारपनवेल। पनवेल के आपटा रॉड पर पिस्टल बेचने...

रोड पर वाहन कम होने से हवा...

नवी मुंबई। भोर से शुरू हुए रंगोत्सव के चलते शहर के सभी बाजार सोमवार को बंद...