मुंबई व आदिवासी पाड्यामध्ये समान विकास होईल तेव्हाच राज्य सुजलाम सुफलाम होईल: प्रविण दरेकर

मुंबई व आदिवासी पाड्यामध्ये समान विकास होईल तेव्हाच राज्य सुजलाम सुफलाम होईल: प्रविण दरेकर

पालघर विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरआयोजित वृक्षारोपण संपन्न


मुंबई, दि. २९ जून - मुंबई मध्ये बहुमजली ५० मजली टॉवर उभे आहेत तर दुसऱ्या बाजूला आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये आजही वीज पुरवठा नाही, हा विकास आहे का ? आजही समाज व्यवस्थेची दोन टोक आहेत. एकाबाजूला झगमगाट असलेली टॉवर आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी पांड्यामधील लोकांची दैनावस्था ही विसंगती ज्या वेळेला दूर होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपले राज्य सूजलाम सुफलाम होईल असे ठाम प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर  यांनी केले 

विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरकडून पालघर येथे आयोजित  वृक्षारोपण कार्यक्रमास विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. त्यावेळी दरेकर म्हणाले, प्रत्येक वेळी आपण आदिवासी समाजासाठी काम करत असतो, निधी देतो असतो.  आदिवासी किंबहुना वंचित समाजाच्या विकासासाठी काम करत असताना दरवर्षी मोठी आर्थिक होत असताना देखील आदिवासी समाज मागासलेला का ? स्वातंत्र प्राप्तीपासून आदिवासी लोकांची प्रगती झाली का? दुर्दैवाने या सर्व आर्थिक निधीची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. पण विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर आदिवासी विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यामुळे येथे माणसं उभी केल्यास बजेट मधील पैशाचा उपयोग गावातील कष्टकरी, पीडितांसाठी होऊ शकेल. ज्या कामातून समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल, अशाप्रकारचे प्रकल्प पुढे नेण्यासाठी, वाढवण्यासाठी किंबहुना राज्यात अशा प्रकारचे प्रकल्प उभे करण्यासाठी आगळी वेगळी भूमिका विरोधी पक्ष नेता म्हणून निश्चितपणे बजावेन असेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

          आदिवासी लोकांसाठी शासकीय बजेट मध्ये तरतूद होते व योजना आखल्या जातात, परंतु प्रत्यक्षात जाऊन ग्राउंडवर त्यांच प्रशिक्षण, उत्पादन, सुविधा यावर अमलबजावणी करावी लागते ती होत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे आदिवासी समाज वंचित राहत आहे. ग्रामीण भागांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प उभे करून येथील वंचित किंबहुना अपेक्षित समाजातील लोकांच्या हाताला काम मिळेल. त्यांना प्रशिक्षित करून बांबूच्या माध्यमातून किंबहुना इतर व्यवसायांमधून रोजगार उपलब्ध होतोय. या निर्माण झालेल्या वस्तु, माल या उत्पादकाला बाजारपेठ मिळवून देण्याचे एक चांगलं काम विवेक सेक्टर करत असल्याबद्दल मी अभिनंदन करतो. वंचितांची सेवा, उपेक्षितांची सेवा, दुर्लक्षित असलेल्या समाजाची सेवा करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे यातचं  ग्रामविकास असल्याचे असे दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

        ग्रामविकास म्हणजे काय हे अशा प्रकल्पातुन पहावयास मिळत आहे, या प्रकल्पातून समाजाचा वारसा, बांधिलकी जपण्याचं काम होत असल्याचं दिसून येत. परिवाराचे संस्कार, परिवाराचे मार्गदर्शनचं वनवासी कल्याण अशोका च्या माध्यमातून ग्रामीण उपेक्षित भागात सेवा देण्याचे आदर्श कार्य होत आहे. दुर्लक्षित घटकाला एकत्रित करन त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणं अशी भूमिका विवेक सेन्टर च्या माध्यमातून दिसून येत आहे.तसेच, या प्रकल्पाच्या मागची भावना, विचारधारा समजून घेतल्यानंतर माझ्यासारख्या नेत्याला या प्रकल्पातून प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. ऊर्जा प्रत्यक्ष कृतीतून मिळत असते त्यामुळे अशाप्रकारचे प्रकल्प बघितल्यानंतर निश्चितपणे हे प्रकल्प आणखी मोठे झाले पाहिजे तसेच अशाप्रकारचे प्रकल्प ठिकठिकाणी झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करू असे दरेकर यांनी यावेळी सांगितले.Most Popular News of this Week