मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
 
पाण्याचा निचरा तातडीने होईल
वाहतूक सुरळीत होईल असे पाहण्याचे यंत्रणांना निर्देश

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत  काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर  जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस  मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले
कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या

मुंबईत पंपींग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी  वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत



Most Popular News of this Week

आपका एक वोट महाराष्ट्र में...

आपका एक वोट महाराष्ट्र में सुराज्य ला सकता है! - सुराज्य अभियानसभी मतदान...

कार्यकर्ताओं, नागरिकों,...

बेलापुर विधानसभा क्षेत्र में होगा बदलाव होगा- सुप्रियाताई...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की प्रचार सभा में विकास परियोजनाओं की बात नवी...

समझदार और जागरूक जनता एक बार...

समझदार और जागरूक जनता एक बार फिर सद्भावना और जीत का आशीर्वाद हमें देगी- गणेश...

मतदान प्रतिशत बढ़ाने के लिए...

मतदान प्रतिशत बढ़ाने के लिए सोसाइटियों के अध्यक्ष एंव सचिव के साथ...

बेलापुर विधायक का जनता से...

बेलापुर विधायक का जनता से संवाद का अभाव,महाविकास आघाड़ी के उम्मीदवार संदीप...