उत्तर भारतीय मोर्चाने सेवा कार्याच्या माध्यमातून पक्ष वाढवावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

उत्तर भारतीय मोर्चाने सेवा कार्याच्या माध्यमातून पक्ष वाढवावा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

 

उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सेवा ही संघटन या मंत्राच्या आधारावर काम करून पक्षाचे काम वाढवावे. कृपाशंकर सिंग यांच्यासारखा ज्येष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली उत्तर भारतीय मोर्चाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाचे काम तळागाळापर्यंत न्यावेअसे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उत्तर प्रदेश भाजपा प्रवक्ते ओमप्रकाश सिंहभाजपा प्रदेश सचिव अखिलेश चौबेउत्तर भारतीय मोर्चाचे सरचिटणीस डॉ. संजय पाण्डेय आदी उपस्थित होते.     

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले कीउत्तर भारतीय मोर्चाने भाजपाचे काम वाढविण्यासाठी बूथ पातळीवर रचना केली पाहिजे. त्याचबरोबर उत्तर भारतीयांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला पाहिजे. विविध सेवा उपक्रम राबविले तर उत्तर भारतीय जनता पक्षाशी जोडली जाईल.   

या प्रसंगी कृपाशंकर सिंह यांनी सांगितले कीराष्ट्र प्रथम आणि पक्ष नंतर या विचारधारेमुळे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या विचारधारेसाठी आपण कायमच कार्यरत राहू. महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी उत्तर भारतीय नेहमीच अग्रभागी राहतील.

उत्तर भारतीय मोर्चाने राज्यात पक्षाचा पाया मजबूत कारण्यासाठी आजवर नेहमीच प्रयत्न केले आहेत. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी राजवट उलथवून टाकण्यासाठी उत्तर भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते आपली सर्व शक्ती पणाला लावतीलअशी ग्वाही उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय पाण्डेय यांनी दिली. 

मोर्चाचे सरचिटणीस ब्रिजेश सिंहप्रद्युम्न शुक्ला यांचीही यावेळी भाषणे झाली.


Most Popular News of this Week

Chembur Gymkhana Crowned Motiram Cup Champions

Chembur Gymkhana emerged the champion badminton club among men, winning the Elite Division of the Motiram Cup badminton tournament, organised by GMBA, promoted by Badminton Gurukul and hosted by...

बांद्रा गरीब नगरमध्ये मोठी...

मुंबईतील बांद्रा पूर्व परिसरातील गरीब नगर येथे सध्या सुरू असलेल्या...

अखिल भारतीय कामगार कर्मचारी...

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत...

Chembur Gymkhana Shines as Maharashtra’s Billiards Powerhouse

Chembur Gymkhana etched its name in glory by emerging victorious in the prestigious Nestlé–BSAM Billiards League 2026, a tournament organized under the Billiards & Snooker Association of...