मुंबई आरसीएफ पोलीसांनी बस चोरास आसाम राज्यातून केले अटक
●ग्लोबल चक्र न्यूज
मुंबई: एका बस चोरास आसाम राज्यातून अटक करून मुंबईत आणल्यामुळे आरसीएफ पोलीसांच्या तपास टीम ची सगळ्यांकडून कौतुक केले जात आहे.
मुंबई पोलीस परिमंडळ सहा चे पोलीस उपयुक्त कार्यालय यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार चेंबूर माहुल गाव येथून 21 नोव्हेंबर 2022 रोजी बस चोरी झाल्याने अज्ञात इसमाविरोधात आरसीएफ पोलीस ठाणे, गु. नो. क्र. ६८५/२०२२ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरचा गुन्हा दाखल होताच आरसीएफ पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि किरण मांढरे व पथक यांनी गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेवून दोन आरोपीत निष्पन्न करण्यात यश मिळविले. परंतु सध्याचा त्यांचा ठावठिकाणा हा आसाम येथे असल्याची माहिती मिळाल्याने नमुद पथक 3 डिसेंबर 2022 रोजी आसाम राज्य येथे तपासकामी रवाना झाले.
आसाम राज्य पोलीसांसोबत योग्य समन्वय साधून व अथक परिश्रम करून आसाम राज्य बांग्लादेश सीमेजवळील गोवर्धन पहार येथील डोंगराळ दुर्गम भागामध्ये पाहिजे आरोपीतांचा शोध घेतला असता सदर आरोपीत हा विस्तीर्ण जंगलामध्ये पळून गेला. नमूद जंगलामध्ये शोध घेणेकरीता स्थानिक पोलीस ठाण्याच्या पथकासह रात्रीच्या वेळी सर्व अभियान राबवून तीन तासाच्या अथक परिश्रमाने 8 डिसेंबर 2022 रोजी रात्री 3 वाजताचे दरम्यान आरोपी नामे सुशील उर्फ जोणुदास, वय २३ वर्षे, रा. ठी. - प्रयागनगर झोपडपट्टी, युनो बँक एटीएमच्या बाजूला, एल यु गडकरी मार्ग, चेंबूर, मुंबई ७४ (मुळचा पत्ता- ग्राम मिसामारीए, पोस्ट कुत्तीमारी बाजार, एकछुआ पोलीस ठाणे अंतर्गत नागाव जिल्हा, राज्य आसाम) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, हेमराजसिंह राजपूत, सपोआ सुहास हेमाडे यांचे मार्गदर्शनाखाली आरसीएफ पोलीस ठाणेचे वपोनि बाळासाहेब घावटे, सपोनि किरण मांढरे, पोना प्रितम पाटील, पोना चंद्रकांत खैरे, पोशि सुदाम सानप यांनी केली.