हैडलाइन

माझे विरोधक मराठी-गुजरातीला निवडणुकीचा मुद्दा बनवत आहेत कारण त्यांना विकासावर बोलायचे नाही: मिहिर कोटेचा

माझे विरोधक मराठी-गुजरातीला निवडणुकीचा मुद्दा बनवत आहेत कारण त्यांना विकासावर बोलायचे नाही - मिहिर कोटेचा


 मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे माझे ध्येय आहे - कोटेचा


 मुलुंडमध्ये कोणतेही पीएपी (PAP) नाही असे बीएमसीने लेखी म्हटले आहे - कोटेचा


मुंबई: ईशान्य मुंबईतील भाजप-महायुतीचे उमेदवार आणि मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी बुधवारी "द मुंबई डिबेट - इलेक्शन २०२४" या कार्यक्रमात भाग घेऊन नागरिक आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली.  हा कार्यक्रम प्रजा फाउंडेशन नी आयोजित केला होता.


कोटेचा यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी आणि मुंबईसाठी त्यांचे व्हिजन शेअर केले.  मी पायाभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीने माझ्या मतदारसंघाचा आणि शहराचा सर्वांगीण विकास पाहत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेनचे जाळे सुधारल्यामुळे गेल्या 10 वर्षातील रेल्वे प्रवास अधिक सुकर झाला आहे. मुलुंडमध्ये रेल्वेची जमीन आहे. त्या जमिनीवरील आम्हाला नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुखकर प्रवासासाठी रेल्वे टर्मिनल करायचे आहे, पर्यटन सुधारण्यासाठी आम्ही मुलुंडमध्ये जागतिक दर्जाच्या बर्ड पार्कची योजना आखत आहोत ज्याला लवकरच वर्क ऑर्डर मिळेल आणि एका टेकडीवर रोप वे (केबल कार) आणण्याचा प्रयत्न आहे, असे कोटेचा यांनी स्पष्ट केले. 

 

कोटेचा पुढे म्हणाले की, त्यांच्या विरोधकांकडे व्हिजन नाही म्हणून ते भाषा आणि हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत आहेत. माझे विरोधक गुजराती विरुद्ध मराठी असा मुद्दा उपस्थित करत आहेत. मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, मी इथेच लहानाचा मोठा झालो आहे. विधानसभेतील माझी सर्व भाषणे मराठी मध्येच आहेत. मला मराठी लिहिता नी वाचता येत. माझी प्रचार यात्रेवरती तीन वेळा हल्ला झाला आणि त्यात माझी एक महिला सहकारी जखमी झाली. यामागे शिवसेना (ऊबाठा) उमेदवार संजय दिना पाटील यांच्या लोकांचा हात असल्याचा दावा कोटेचा यांनी केला. 


अल्पसंख्याकांचे प्रश्न आणि ते भाजपला मतदान करणार का, यावर बोलताना ते म्हणाले, "काँग्रेस अल्पसंख्याकांना संपत्ती वाटण्याबद्दल बोलत आहे. मोदी सरकारने धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. आयुष्मान कार्डचे उदाहरण घ्या.  दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना (बीपीएल) कार्ड जारी करणाऱ्या कुटुंबांमध्ये धर्माच्या आधारे फरक पडतो का?  ज्या तरुणांना त्यांच्या मुलांचे चांगले भविष्य हवे आहे, ते आम्हाला मतदान करतील, ते या भागातील अंमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यावर आणि व्यसनाधीनांसाठी पुनर्वसन केंद्रे निर्माण करण्यावर भर देतील, असेही कोटेचा यांनी म्हटले. 


मुलुंडमधील पीएपी प्रकल्पाबाबत विरोधक पहिल्या दिवसापासून विविध आरोप करत होते. मात्र या प्रकल्पासाठी मुलुंडमध्ये एकही जमीन देण्यात आलेली नाही.  नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्पष्टीकरण दिले आहे की त्यांच्याकडे बीएमसीचे लेखी पत्र आहे की पीएपीसाठी एकही जागा दिली गेली नाही.  धारावी पुनर्विकास अधिकाऱ्यांनी जी जमीन मागितली होती ती मुलुंड डम्पिंग ग्राउंड होती. पुढील 6 वर्षे मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याने तेथे कोणताही विकास प्रकल्प करता येणार नाही, असे कोटेचा यांनी स्पष्ट केले. 


झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी आपले व्हिजन सांगताना कोटेचा म्हणाले की, मुलुंडचा आमदार म्हणून मी गेल्या साडेचार वर्षांत झोपडपट्टी पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या मजूर/कामगारांना 3 चौरस किलोमीटरच्या आत घरे दिली जावीत.  बँकांकडून मिळणारा निधी आणि नोकरशाहीतील लालफिती काढून टाकल्यास पुनर्विकासाची प्रक्रिया जलद होण्यास मदत होईल.


Most Popular News of this Week

महाराष्ट्रातील महिलांवरील...

महाराष्ट्रातील महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण: MVA आणि महायुती युगामध्ये...

"संविधान जागर यात्रा 2024: मजबूत...

"संविधान जागर यात्रा 2024: मजबूत लोकशाहीच्या दिशेने"आपल्या देशात संविधान लागू...

"संविधान जागर यात्रा 2024: सशक्त...

 "संविधान जागर यात्रा 2024: सशक्त नागरिकता की एक नई शुरुआत"?मुंबई। अपने देश...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या, DGP...

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या...

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर फक्त गुन्हे दाखल करून चालणार...