मुलुंडमध्ये लवकरच न्यायालयाची नवीन इमारत बनणार -कोटेचा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले पत्र

मुलुंडमध्ये लवकरच न्यायालयाची नवीन इमारत बनणार

कोटेचा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले पत्र

 मी याबाबत शासनाकडे पाठपुरावा करत आहे: कोटेचा

मुंबई : 80 वर्षे जुनी मोडकळीस आलेली मुलुंड न्यायालयाची इमारतीच्या जागेवर लवकरच न्यायालयाची नवीन इमारत बांधली जाणार आहे. या इमारतीमध्ये महसूल कार्यालये आणि इतर प्रशासकीय कार्यालये देखील असतील.  मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा लावून उचलून धरला आहे.


कोटेचा यांनी डिसेंबर 2023 मध्ये फडणवीस यांना पत्र लिहून न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामध्ये महसूल आणि इतर प्रशासकीय कार्यालयांचा देखील समावेश आहे.  मुलुंडमधील ३७६ आणि ३७६ अ या शासकीय भूखंडावर न्यायालयाची नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव कोटेचा यांनी दिला आहे.


मुलुंड न्यायालयाची इमारत 80 वर्षे जुनी आहे. ती जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहे. अनेक वर्षांपासून नवीन न्यायालय इमारत आणि महसूल इमारत बांधण्याची मागणी शासनाकडे प्रलंबित आहे. सध्या मुलुंड न्यायालयाच्या इमारतीत दोन मेट्रोपोलीटन न्यायालये, एक महसूल कार्यालय आणि 12 इतर प्रशासकीय कार्यालये आहेत, असे कोटेचा यांनी सांगितले. 


कोटेचा पुढे म्हणाले की, 500 हून अधिक सरकारी कर्मचारी तेथे काम करतात आणि 1000 हून अधिक लोक दररोज विविध कामांसाठी न्यायालये, महसूल कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयांना भेट देतात.


अपुरी जागा आणि जीर्ण इमारतीमुळे न्यायालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने या समस्येचा जलद मार्ग काढला पाहिजे आणि त्यास प्राधान्य दिले पाहिजे यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे, असे कोटेचा पुढे म्हणाले.


गेल्या दोन महिन्यांपासून कोटेचा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील प्रचारात विकासाचे विविध मुद्दे मांडत आहेत.  त्यांनी मुलुंड बर्ड पार्क, भांडुप आणि विक्रोळी येथील सांस्कृतिक केंद्र आणि मुलुंड ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत रोपवे (केबल कार) यासह इतर समस्यांसह विकास कामे हाती घेतली आहेत.