आज वाशी येथे मकरंद अनासपुरे यांचे "अनुभवाचे बोल" विषयावर मार्गदर्शन

आज वाशी येथे मकरंद अनासपुरे यांचे "अनुभवाचे बोल" विषयावर मार्गदर्शन

नवी मुंबई - नाम फाऊंडेशनचे संस्थापक तथा सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे "अनुभवाचे बोल" या विषयावर वाशी येथे महाशिवरात्रीच्या कार्यक्रमानिमित्त 
मार्गदर्शन करणार आहेत. श्री सोमेश्वर शिवमंदीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वाशीतील एम.जी. कॉम्प्लेक्स येथे महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक प्रकाश (भाऊ) मोरे यांनी दिली. 
या कार्यक्रमामध्ये शिवरुद्रयाग यज्ञ आणि महाप्रसादाचे (भंडारा), गायत्री पाठ, जनजागृती भारूड मंडळ, भारूडसम्राट गोविंद महाराज गायकवाड हे विनोदातून समाज प्रबोधन करणारे भारूड सादर करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी हळदी समारंभ होणार आहे. २५ फेब्रवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता अभिनेते मकरंद अनासपुरे हे "अनुभवाचे बोल" या विषयावर व्याख्यान देणार आहे. 
२६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ५ वाजता शिवलिंग महाभिषेक सोहळा, शिवरूद्रयाग यज्ञ आणि दर्शन सोहळा, सकाळी ९  ते २ वाजेपर्यंत महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर, सायंकाळी ६ वाजल्यापासून महाप्रसाद (भंडारा) होणार आहे. या कार्यक्रमाला वन मंत्री गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक आदी उपस्थित रहाणार आहेत.


Most Popular News of this Week

"आयुक्त अश्विनी भिडे यांची...

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एच पश्चिम विभागातील...

महाराष्ट्र के 300 से अधिक...

चेतना एजुकेशन लिमिटेड और स्कूल वेलफेयर मैनेजमेंट फोरम के संयुक्त...

सुनेत्रा पवार...

सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला...

बृहन्मुंबई महानगरपालिका...

‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्वच्छतेची दृश्यमानता (Visibility)...

भाजपाला महिलांना आरक्षण...

महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून भारतीय जनता पक्ष फक्त राजकीय पोळी...

महिला आरक्षणावर खुल्या...

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पण...