हैडलाइन

बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समितीची निवडणूक बिनविरोध

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष, उप अध्यक्ष पदासाठीची निवडणूक आज (दिनांक १३ मार्च २०२६) महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष आणि उप अध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे हरिष भांदिर्गे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उप अध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाचे रितेश राय यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 


बाजार व उद्यान समिती अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या हेतल गाला यांचे एकमेव नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उप अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे भास्कर शेट्टी यांचे एकमेव नामनिर्देशन प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समितीचे सदस्य उपस्थित होते.  

सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष, उप अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अनुक्रमे महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. 

यावेळी सह आयुक्त (सुधार) संजोग कबरे, उप आयुक्त (उद्याने)  अजितकुमार आंबी, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, सहायक आयुक्त (बाजार) अलका ससाणे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या (के.ई. एम) अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रमोद इंगळे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रू. न. कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता (प्रभारी) डॉ. देव शेट्टी, नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माला दीक्षित, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, उद्यान अधीक्षक  जितेंद्र परदेशी आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.



Most Popular News of this Week

स्वामी समर्थांच्या प्रकट...

भांडुप पश्चिम येथील माता रमाबाई नगर आणि साई हिल परिसरात श्री स्वामी समर्थ...

मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या...

मुंबई शहर उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून पालिकेच्या...

मुंबई काँग्रेसचे एलपीजी गॅस...

अमेरिका इराण युद्धामुळे गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा मुंबईसह राज्यात जाणवू...

सोनखार-पामबीचमध्ये ‘संयुक्त...

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोनखार-पामबीच परिसरात हिंदू नववर्षाचे...

INDIAN NAVY CONTINUES IOS SAGAR INITIATIVE TO STRENGTHEN MARITIME PARTNERSHIP...

 Reaffirming India’s commitment to collaborative maritime security in the Indian Ocean Region, the second edition of Indian Ocean Ship (IOS) SAGAR commenced on 16 Mar 2026 .The Indian Navy...

मुख्य सचिवांनी घेतली...

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल  यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु...