हैडलाइन

विक्रोळीतील साई पालखी सोहळ्यात भक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद, खा. संजय दिना पाटील यांनी घेतले दर्शन

दादर येथील साई सेवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या मुंबई ते शिर्डी साई पालखी सोहळ्याला यंदाही विक्रोळी परिसरात भक्तांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. विक्रोळीतील कन्नमवार नगर, साई चौक येथे पालखीच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी हजारो साईभक्तांनी गर्दी केली होती.

सोमवारी दुपारी दादर येथून निघालेली ही पालखी विक्रोळी, कन्नमवार नगर येथे विश्रांतीसाठी थांबली होती. या ठिकाणी साई एकता सेवा मंडळाच्यावतीने पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी आणि भक्तांसाठी भोजन व विश्रांतीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.


यावेळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी पालखीसमोर साईंची आरती करून दर्शन घेतले. त्यांच्या सोबत भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांनीही उपस्थित राहून साईंचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, खासदार संजय दिना पाटील यांनी पालखीला खांदा देत भक्तिभाव व्यक्त केला, ज्यामुळे उपस्थित भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

पालखी सोहळ्यादरम्यान ‘साई राम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भजन-कीर्तनांच्या सुरावटीत आणि भक्तीमय वातावरणात हा सोहळा अधिकच रंगतदार झाला. हजारो भक्तांनी पालखीचे दर्शन घेत साईबाबांच्या चरणी प्रार्थना अर्पण केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही साई सेवक मंडळाने आयोजित केलेल्या या पालखी सोहळ्याने भक्तांना अध्यात्मिक ऊर्जा देत मुंबई ते शिर्डी या प्रवासाची भक्तिमय सुरुवात केली.


Most Popular News of this Week

सनातन संगम: एकमत्व का उत्सव...

भव्य सामुदायिक समारोहसनातन संगम: एकमत्व का उत्सव वसंत ओएसिस बीएमसी...

स्व. दिना बामा पाटील...

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ, घाटकोपर (पंतनगर) यांच्या वतीने...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...

पवित्र रमजान महिन्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने...

मालमत्ता कर न भरणाऱ्या ६ हजार...

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या...

पामबीच मार्गावर अनधिकृतपणे...

नवी मुंबईमध्ये सिडको  व नवी मुंबई महानगरपालिका मालकीच्या...

डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालय येथे...