हैडलाइन

पामबीच मार्गावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या लोखंडी कमानीबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी लक्षवेधी मार्फत शासनाचे वेधले लक्ष

नवी मुंबईमध्ये सिडको  व नवी मुंबई महानगरपालिका मालकीच्या उद्यान,मैदाने,नाले तसेच आरक्षित असलेल्या भूखंडावर भूखंड माफिया यांनी सर्रासपणे अनधिकृत बांधकामे उभारली आहेत या संदर्भात मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी लक्षवेधी मार्फत शासनाचे लक्ष वेधले. 

सदर लक्षवेधीमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विशेषत: पामबीच मार्गावरील बेकायदा लावण्यात आलेल्या जाहिरात डिजिटल फलक शासनाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, पामबीच मार्गाच्या अलीकडे किंवा पलीकडे कोणतेही सरंचना उभारणी करायची असेल तर महाराष्ट्र सागर किनारा नियामक प्राधिकरणाची (एमसीझेडएमए) परवानगी घेणे, वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे तसेच इतर संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक असते परंतु कोणत्याही परवानगी न घेता सदर पामबीच व मोराज सर्कल अथवा इतरत्र ठिकाणी जाहिरातींसाठी लोखंडी सांगाडे उभारण्याची  कामे सुरू आहेत.

अशा उभारण्यात येणाऱ्या तेजस्वी प्रकाश, सतत बदलणारे व्हिडिओ किंवा एनिमेशन यामुळे काही सेकंद चालकाचे लक्ष रस्त्यावरून हटू शकते, आणि वेगाने चालणाऱ्या वाहनांमध्ये ते धोकादायक ठरू शकते. पामबीच येथे मार्गावर लावण्यात येणाऱ्या LED जाहिरात फलकामुळे तेजस्वी प्रकाश, सतत बदलणारे दृश्य यामुळे वाहनचालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या व वाहनधारकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सदरचे काम हे त्वरित थांबवावे असे असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी लक्षवेधी मार्फत सभागृहात सांगितले. 

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेच्या सामाजिक सेवेच्या आरक्षित असलेल्या अशा अनेक भूखंडावर अनधिकृत बांधकाम करणे म्हणजे एक प्रकारे गुन्हा असून, ज्या आरक्षित भूखंडावर भूमाफिया व महानगरपालिका सदस्यांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी गोडाऊन,भंगाराचे दुकान, नर्सरी, ढाबे असे विविध प्रकारचे उत्पन्न निर्माण करून  अनधिकृत बांधकाम उभारले आहेत व भूमाफिया यांनी सर्व नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकामांचा सपाटा लावला आहेत असे बांधकाम लवकरात लवकर निष्काशित करावे असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. 

तसेच सदर लक्षवेधी वर नगरविकास मंत्री महोदयांनी निवेदन केले की, सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेस ६२८ भूखंड हस्तांतरित केले असून यापैकी २९ आरक्षित भूखंडावर विविध प्रकारची अतिक्रमणे/अनधिकृत बांधकामे निदर्शनास आल्याचे असल्याचे नगरविकास मंत्री यांनी त्यांच्या उत्तरामध्ये नमूद केले आहे. 

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक बेकायदेशीर / अनधिकृत बांधकामे महानगरपालिका सदस्यांनी केल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या असल्याचे ही नगरविकास मंत्री यांनी स्पष्ट केले आहे.

 येत्या ८ दिवसात पामबीच येथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे मंत्री महोदयानी सांगितले .


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...