हैडलाइन

डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, उप महापौर संजय घाडी यांचे प्रशासनाला निर्देश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालय येथे स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे यासारख्या प्रकाराविरोधात नियमानुसार कार्यवाही करावी. त्याअनुषंगाने चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे निर्देश उप महापौर संजय घाडी यांनी दिले. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालय येथे उप महापौर संजय घाडी यांनी भेट दिली. रुग्णालयातील विविध पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात सुपर स्पेशालिटी क्षमता विकसित करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 


 यावेळी नगरसेवक दीपक कोतेकर, अनिष मकवाना, सुधा सिंह, डॉ. आर. एन कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता (प्रभारी) डॉ. देव शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णालयातील अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, बालकांचा कक्ष आदी ठिकाणी उप महापौर संजय घाडी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आदींबाबत रुग्णांसोबतही संवाद साधला. रुग्णालय प्रशासनामार्फत रुग्णांना सद्यस्थितीला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचेही श्री. घाडी यांनी कौतुक केले. वैद्यकीय सेवेचा उपनगरीय रुग्णालयांमध्ये डॉ. रु. न. कूपर रुग्णालयावर मोठा ताण येत आहे. रुग्णालयात सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय सेवांची पूर्तता करण्यासाठी मंजूर पदांचा अनुशेष भरून काढणेही गरेजेचे आहे. रुग्णालयातील विविध पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 



 रुग्णालयातील स्वच्छतेला प्राधान्य देतानाच रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. रुग्णालयात प्रवेश करतेवेळीच तंबाखूजन्य पदार्थ नेता येणार नाही, यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने कडक कार्यवाही करावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या अनुषंगाने दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करावी, असे निर्देशही उप महापौर श्री. संजय घाडी यांनी दिले. रुग्णालयात अस्वच्छता करणाऱयांविरोधात कार्यवाहीचा धाक बसावा, यादृष्टीने रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत नियमांची जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही श्री. घाडी यांनी शेवटी नमूद केले.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...