हैडलाइन

भांडुप स्टेशन रोडवरील कपड्यांच्या स्टॉलला आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक

भांडुप पश्चिम येथील ड्रिम्स् मॉलला लागून असलेल्या स्टेशन रोडवरील कपड्यांच्या स्टॉलला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीत दोन दुकाने जळुन खाक झाली तर इतर काही दुकानांना त्याची झळ बसली. सुदैवाने इतर दुकानदारांनी त्यांच्या दुकानातील सामान बाहेर काढल्याने आगीवर काहीसे नियंत्रण मिळविता आले. या आगीत लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. 


भांडुप स्टेशन रोडवरुन एलबीएस मार्गाकडे जाताना ड्रिम्स् मॉलला लागुन असलेल्या कपड्यांच्या स्टॉलला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. स्टॉलमध्ये मोठ्या प्रमाणात कपड्यांचा माल असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. त्यात इतर स्टॉलही आगीच्या भक्षस्थानी सापडले. आग इतर स्टॉलपर्यंत जाऊ नये म्हणुन स्टॉलमधील माल बाहेर काढल्याने आग काहीसी नियंत्रणात आली.


अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. स्टॉलच्या पाठीमागील बाजुस व छतावर मोठ्या प्रमाणवर पुठ्ठे आणि प्लास्टिक ठेवण्यात होते. त्यामुळे शॉर्ट सर्किट होताच कपडे, पुठ्ठे व प्लास्टिकने आग पकडली. या आगीत दोन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. मनोज बावरीया यांचे सत्यम कलेक्शन व राजेश गुप्ता यांचे पूर्णा कलेक्शनला पुर्णपणे जळून खाक झाले तर भावना कलेक्शनला आगीची झळ बसली.



Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...