हैडलाइन

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची मंजुळा’च्या कलाकारांचे जल्लोषात स्वागत; विशेष स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी चित्रपट ‘तुंबाडची मंजुळा’च्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन मुंबईतील चेंबूर येथील क्यूबिक मॉलमध्ये करण्यात आले होते. या विशेष सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांनी उपस्थिती लावताच प्रेक्षकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

चेंबूरचे माजी आमदार प्रकाश फातर्पेकर आणि ज्येष्ठ छायाचित्रकार आमोदन यांच्या पुढाकाराने या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहिले होते. कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


यावेळी झी स्टुडिओचे दीपक माने यांच्यासह ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रपटातील प्रमुख कलाकार अंशुमन विचारे, अथर्व रुके, प्रियल नाईक, उषा नाडकर्णी, योगेश शिरसाठ, शार्दुल, उमेश जगताप, विविध कोरगावकर आणि कौशल गोस्वामी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत चित्रपटाच्या चित्रीकरणातील अनुभव आणि पडद्यामागील काही खास आठवणीही शेअर केल्या. प्रेक्षकांनीही कलाकारांशी संवाद साधत चित्रपटाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले. विशेष स्क्रीनिंगदरम्यान संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि आनंददायी झाले होते. चेंबूरमधील या कार्यक्रमामुळे चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले.


Most Popular News of this Week

स्वतंत्रता दिवस पर सायन...

देश अपना 80वां स्वतंत्रता दिवस मना रहा है। इसी अवसर पर सायन कोलीवाड़ा...

गोवंडी के VK English High School में...

गोवंडी स्थित VK English High School में 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर ध्वजारोहण एवं...

कुर्ला परिसरातील दुर्घटनेत ६...

कुर्ला परिसरात घडलेल्या दुर्घटनेत एकूण १० जण बाधित झाल्याची माहिती समोर...

मुंबई पुलिस, CWC अधिकारियों और...

मुंबई में बाल श्रम से संबंधित मामले के चलते CWC की संरक्षण व्यवस्था में रह रहे...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ‘मुंबई पब्लिक स्कूल, शिवाजी...

“तिरंगा यात्रा ५२ वर्षे ध्वज...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज...