हैडलाइन

जय पवार यांची मान्सूनच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रादेशिक हवामान केंद्राला भेट; शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्र (Regional Meteorological Centre - RMC) ला नुकतीच भेट दिली.

यावेळी हवामान खात्याचे तज्ज्ञ बिक्रम सिंग यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा दिला. त्यानंतर डॉ. नायर, सौ. निथा, डॉ. जिस्मी आणि योगेश यांच्यासोबत जय पवार यांनी सखोल चर्चा केली.


या चर्चेदरम्यान पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबामागील विविध कारणांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. यामध्ये एल निनो (El Niño) चा संभाव्य प्रभाव तसेच इतर महत्त्वाच्या हवामानविषयक घटकांवर चर्चा झाली. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सुमारे २५ जूनच्या आसपास पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. राज्यातील शेतकरी वर्ग पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पावसाच्या विलंबाचा जलसाठे, शेती क्षेत्र आणि सर्वसामान्य जनजीवनावर थेट परिणाम होत असल्याने, या परिस्थितीचा अचूक आढावा घेणे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा जय पवार यांच्या या भेटीचा मुख्य उद्देश होता.

राज्यात पाऊस पूर्णपणे सक्रिय होऊन समाधानकारक आणि सातत्यपूर्ण सुरू होईपर्यंत पेरणीसाठी घाई करू नका. घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करूनच पुढील निर्णय घ्या असे आवाहन जय पवार यांनी शेतकऱ्यांना केले. 

दरम्यान पाऊस नियमित सुरू होत नाही तोपर्यंत जय पवार हे प्रादेशिक हवामान केंद्राशी संपर्कात राहून पावसाच्या प्रगतीविषयीची अचूक व अद्ययावत माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


Most Popular News of this Week

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के विधानसभा मुख्य सचेतक चेतन तुपे ने...

'स्टार्टअप फ्रंटियर 1.0'मध्ये...

राज्यातील स्टार्टअप संस्कृतीला नवी दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात...

भक्ति, संगीत और उत्साह से सजी...

मुंबई के Alberione Hall, St. Paul's College & Media Complex, Bandra West में वरिष्ठ नागरिकों के लिए "Bhajan Jamming Evening" का...

ALL INDIA NAU SAINIK CAMP 2026 CONCLUDES AT INS SHIVAJI, LONAVALA

The National Cadet Corps’ flagship annual training camp for Naval Wing cadets, All India Nau Sainik Camp (AINSC) 2026, concluded at INS Shivaji, Lonavala. Organized by NCC Directorate Maharashtra...

महापौर रितू तावडे यांच्यासह...

मुंबईच्या महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, समाजवादी...

एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल...

            नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अर्थात...