प्रियदर्शिनी पार्कमध्ये योग दिनाचा जल्लोष; पावसातही रामदास आठवलेंनी केली योगासने

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रोज दोन तास योगा करतात मी सुद्धा रोज अर्धा तास योगा करतो.योगासन केल्यामुळे आपल्याला ताकद मिळते. योगा करीत नसतो तर तुमच्या समोर उभे राहू शकलो नसतो.शारीरिक आणि मानसिक ताकद योगामुळे मिळते.सदृढ ठेवण्यासाठी तन आणि मन रोज करा योगासन असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले. 

मलबार हिल येथील प्रियदर्शिनी पार्क येथे आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त योगासनांचा अभ्यास आयोजित करण्यात आला होता.यावेळी सकाळी 7 वाजता प्रियदर्शिनी पार्क मध्ये पावसाचे आगमन झाले. तरीही पावसाच्या धारा आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवितांचे तुषार्त यांच्या संयोगातून अत्यंत उत्साहात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी खासदार मिलिंद देवरा; आमदार मनिषा कायंदे; सुशिबेन शहा; योग प्रशिक्षक रवी दीक्षित; माधवबागचे डॉ रोहित साने;अपर्णा खानोरे ; किशोर मडावी रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मेडिटेशन ही भगवान बुद्धांनी जगाला दिलेली अनमोल भेट आहे. मेडिटेशन, विपश्यना, योग मानवी जीवनाला निरोगी राखण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.त्यामुळे प्रत्येकाने योगा ला आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक करा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. यावेळी अनेक योगासनांचा अभ्यास रामदास आठवले यांनी केला. अनेक योगासने रामदास आठवले यांनी केली.

भाषणाच्या सुरुवातीपासूनच रामदास आठवले यांनी आपल्या उत्स्फूर्त कवितांनी उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला. अचानक पाऊस सुरू झाल्यावर रामदास आठवले म्हणले -योगा करण्याची आम्हा सर्वांना हौस मग का येणार नाही पाऊस? 

त्यानंतर शेवटी ते म्हणाले-पाऊस आता गेला आहे..आम्ही योगा केला आहे...आता आम्ही जाणार आहोत पुढच्या वर्षी येणार आहोत! 

 रामदास आठवले हे भाषणास पुढे येताच उपस्थितांनी आम्ही तुमच्या कवितांचे चाहते आहोत असे सांगत कविता सुद्धा ऐकविण्याचा आग्रह धरला होता.

यावेळी माधवबाग तर्फे काढण्यात आलेले मोटापा मुक्त भारत अभियान च्या पोस्टर चे प्रकाशन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

Most Popular News of this Week

टाटा मेमोरियल सेंटरच्या Patient...

कर्करुग्णांना वेळेवर उपचार, योग्य मार्गदर्शन आणि उपचार प्रक्रियेत...

Sunil Gavaskar Celebrates 43rd Anniversary of India's 1983 World Cup Victory...

Legendary Indian Cricketer Sunil Gavaskar hosted a grand party on the 43rd anniversary of the historic 1983 World Cup Win. World Cup winning captain Kapil Dev with daughter , teammates Mohinder...

महानगरपालिका आरोग्य...

महानगरपालिका रुग्णालयांमधील रुग्णसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि...

Sunil Gavaskar Celebrates 43rd Anniversary of India's 1983 World Cup Victory...

Legendary Indian Cricketer Sunil Gavaskar hosted a grand party on the 43rd anniversary of the historic 1983 World Cup Win. World Cup winning captain Kapil Dev with daughter , teammates Mohinder...

मुंबई पावसाने झोडपली;...

बृहन्मुंबई क्षेत्रात दोन-तीन दिवस पहाटे मुसळधार पाऊस झाला. या...