हैडलाइन

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी केली विविध भागांची पाहणी

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी मुंबई शहर विभागातील विविध भागांना भेटी देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच महानगरपालिकेच्या पावसाळी यंत्रणांकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संबंधित विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत आवश्यक त्या सूचना दिल्या.

वर्मा-लवंगारे यांनी सोमवारी सकाळी मलबार हिल, आंबेवाडी (काळाचौकी), माहीम, महेश्वरी उद्यान परिसर, रवींद्र नाट्य मंदिर परिसर, हिंदमाता तसेच अन्य भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, पाणी साचणारी ठिकाणे, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कार्यरत असलेली यंत्रणा, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची सज्जता आणि नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवांचा त्यांनी सखोल आढावा घेतला. 


तसेच पाहणीदरम्यान ज्या ठिकाणी झाडे अथवा झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना निदर्शनास आल्या, त्या ठिकाणी महानगरपालिकेची यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करून झाडे हटविण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पावसामुळे वाहतुकीत अथवा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी वॉर्ड स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतत सतर्क राहून सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याच्या सूचना दिल्या. पाणी साचणे, झाडे कोसळणे, पाण्याचा निचरा होण्या संबंधित अडचणी किंवा अन्य कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर तातडीने प्रतिसाद देऊन त्याचे निराकरण करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी अथवा गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रत्येक तक्रारीवर त्वरित आणि प्रभावी कार्यवाही करण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच मुंबईकरांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही  प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी केले. 

या पाहणी दौऱ्यावेळी उप आयुक्त (परिमंडळ-१) चंदा जाधव, उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर तसेच संबंधित विभागांचे अन्य वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

आज से एक पखवाड़े तक बरसेगी...

उत्तर भारत में भगवान महादेव की स्तुति के श्रावण का पवित्र महीना कल से शुरू...

आषाढी वारीत संघर्षाची कहाणी...

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेते आदेश बांदेकर...

विद्यार्थ्यांवर पॅलेट गन...

नीट पेपर फुटी प्रमाणेच राज्यात सीईटी व टीईटीचे पेपर फुटले आहेत, याचा ६ लाख...

महाराष्ट्रात पैसे...

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठीचे अनेक पेपर फुटले...

आशियातील दुसऱ्या...

राज्यात अन्न व औषध भेसळीविरोधात आपण ज्या पद्धतीने धडक कारवाया सुरू केल्या...

Swift Action Clears Choked Drain, Restores Drainage in Ward 177

During the ongoing fumigation drive, we noticed waterlogging at one junction. Ward 177 Corporator Kalpesha Ben, along with Jesal Bhai Kothari, immediately contacted the concerned authorities to...