हैडलाइन

अहिल्यानगर, पुणे आणि नांदेडमधील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आज ठाण्यात शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे संबंधित भागात उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाकडे होत असलेल्या राजकीय स्थलांतराची ही आणखी एक ठळक नोंद मानली जात आहे.


खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, राधाकिशन बोरकर, राहुल रणधीर, आशिष त्रिभुवन, नेवासाचे उपजिल्हाप्रमुख हरिराम शेळके, नीरज नागरे, पंकज लांभाटे, नितीन जगताप, राहुरीचे डॉ. अजय म्हसे, राजू गुंजाळ, विजय शिरसाट, दीपक पंडित, प्रशांत शिंदे, अकोलेचे महेंद्र धुमाळ, रामहरी तिकांडे, प्रदीप हासे, शिर्डी-राहताचे अनिल बांगरे, सोमनाथ गोरे, विजय मोहोर तसेच कोपरगावचे मुकूंद सिनकर, सचिन मलिक, अशोक पवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.


पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उबाठा गटाचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, भीमराव भोसले, सुधीर पाटील, महादेव सोमवंशी, प्रवीण देवकर तसेच जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या नेतृत्वाखाली गणेश धायगुडे, विजय थिटे, विजयकुमार देवकाते, डॉ. राहुल शंख आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 


दौंड विधानसभा मतदारसंघातील दत्तात्रय शितोळे, संपत शिंदे, विजय गुंड, माजी जिल्हाप्रमुख ॲड. राजेंद्र काळे, विश्वास मांढरे, निलेश मदने, शहाजी दळवी, परेश भापकर यांनीही आपल्या समर्थकांसह शिवसेनेची वाट धरली.


नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, विजयकुमार पाटील सुगावकर, संजय रावणगावकर, गणपत पाटील मंडलापूरकर, किरण पाटील धामणगावकर या पंचायत समिती सदस्यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नवागतांचे स्वागत करत, "शिवसेना ही सर्वसामान्यांची आणि विकासाला प्राधान्य देणारी संघटना आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वेच्छेने शिवसेनेत येत आहेत. जनतेचा विश्वास आणि विकासाची भूमिका हीच आमची खरी ताकद आहे," असे सांगितले.


यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, आमदार विजयबापू शिवतारे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार रवींद्र फाटक, बालाजी पाटील खतगावकर तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...