हैडलाइन

महाराष्ट्रात पैसे देऊन,आपल्या विचाराची लोक यंत्रणेत असावी या हेतूने पेपर लीक केले जात असावी- रोहित पवार

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठीचे अनेक पेपर फुटले आहेत.नीट परीक्षेत पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला तसेच एमपीएससीमध्येही पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला.याचा आका कोण आहे, याचा तपास करणे गरजेचे आहे.पैसे देऊन ,आपल्या विचाराची लोक सिस्टीमध्ये जावी म्हणून काही लोकांनी महाराष्ट्रात नेटवर्क तयार केले आहे. एफडीएच्या अंतर्गत येणाऱ्या औषध निरीक्षक भरतीचा पेपरही असाच फुटला होता,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांची संवाद साधताना म्हटले आहे.

रोहित पवार बोलताना म्हणाले की,गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात टीईटी, नीट, एसआरपीएफ, एचएससी केमेस्ट्री, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोतवाल भरती, तलाठी भरती, महाजनको अशा विविध परीक्षांचे पेपर लीक झाले. या परीक्षांसाठी गरिबांची मुलं खूप परिश्रम घेतात. पण महाराष्ट्रात पैसे देऊन आणि आपल्या विचाराची लोक यंत्रणेत असावी या हेतूने पेपर लीक केले जात असावी,यामध्ये एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही. पण पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली होती. या व्यक्तीने पैसे घेऊन दोन दिवस आधीच औषध निरीक्षक भरतीचा पेपर विद्यार्थ्यांना दिला होता,असे रोहित पवार बोलताना म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की,एफडीएच्या अंतर्गत येणाऱ्या औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटला होता, त्याबद्दल मी सांगतो. एफडीए खात्यात तुकाराम मुंढे यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी असेल तर चांगले काम होते. पण ते वरच्या लेव्हलला आहेत. त्यांच्या खाली असणारे अधिकारीही चांगले असले पाहिजेत.पण पैसे देऊन एखादी व्यक्ती औषध निरीक्षक अधिकारी झाली असेल तर तो नोकरीत आल्यावर आधी पैसे वसूल करण्याचं बघेल. ते काम योग्य पद्दतीने होणार नाही. या पदावर एखादी व्यक्ती पैसे देऊन गेली असेल तर काय अनर्थ होऊ शकतो, याचं उदाहरण आपण महाराष्ट्रात बघितले आहे. कफ सिरपमुळे गरिबांची 22 मुलं मेली. दुर्दैवाने महाराष्ट्रात हाच पेपर फुटला होता आहे. या पदावर गेलेली काही लोकं पैसे देऊन अधिकारी झाली आहेत,असेही रोहित पवार यांनी सांगितले आहे.

रोहित पवार म्हणाले की,औषध निरीक्षक भरतीच्या परीक्षेसाठी 29 जुलैला 2025 जाहिरात आली. 22 मार्च 2026 रोजी परीक्षा झाली. 44500 विद्यार्थी या परीक्षेला बसले. निकालाची तारीख 12 जून होती. त्यानंतर 22 जुलैला तात्पुपरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये 506 उमेदवार पात्र झाले आणि त्यापैकी 150 जण फायनल झाले होते. नंदूरबारमध्ये कौटिल्य ॲकेडमी नावचा एक क्लास आहे. त्या क्लासमधून एका माणसाने पेपर लीक केला. एमपीएएससीचा पूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. या क्लासच्या विद्यार्थ्यांकडे 90 टक्के प्रश्न आधीच होते. दोन दिवस आधी क्सासमधील विद्यार्थ्यांकडे प्रश्न आले होते. विद्यार्थ्यांनी पैसे दिल्यावर संबंधित व्यक्ती त्यांना व्हॉटसॲपवर गोष्टी पाठवायचा आणि दोन-तीन मिनिटांत डिलिट फॉर ऑल करायचा.एका विद्यार्थ्याने सगळे प्रश्न डाऊनलोड झाल्यावर पुरावे असावे म्हणून मित्राला पाठवले आणि पोलिसांना पुरावे सापडले,असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,औषध निरीक्षक भरतीचा मूळ पेपर आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन दिवस आधी पाठवण्यात आलेला पेपर स्क्रीनवर दाखवला.या सगळ्याबाबत आम्ही एमपीएससी कार्यालयात जाणार आहोत. तसेच तुकाराम मुंढे यांनादेखील भेटणार आहोत, असेही रोहित पवार बोलताना म्हणाले.


Most Popular News of this Week

राहुल गांधी के बयान के विरोध...

कांग्रेस सांसद राहुल गांधी द्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय...

"विद्यार्थ्यांच्या पाठीशी...

दिल्लीमध्ये NEET परीक्षेसंदर्भात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के उपलक्ष्य में रविवार को असल्फा...

स्वर्गीय अजितदादा पवार...

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त 'अजित स्मृती अवीट...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी...