हैडलाइन

कोची येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केरळ संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण बैठक

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नियुक्त केलेल्या केरळ प्रतिनिधीमंडळाने कोची येथे पक्षाच्या केरळमधील विद्यमान व माजी पदाधिकाऱ्यांशी नुकताच संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक तसेच आमदार झिशान सिद्दीकी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यावेळी उपस्थित होते.

बैठकीत केरळमधील पक्षाच्या सध्याच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गती देणे, कार्यकर्त्यांचे संघटन अधिक मजबूत करणे, नव्या नेतृत्वाची जडणघडण करणे आणि राज्यभर जनसंपर्क अधिक प्रभावी करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.


बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचना, अनुभव आणि अभिप्राय यांची नोंद घेण्यात आली असून पक्ष संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्राप्त झालेल्या सर्व सूचना आणि शिफारशी राष्ट्रीय नेतृत्वासमोर सादर करण्यात येणार आहेत. केरळमध्ये पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक बळ देण्यासाठी ही बैठक सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचे सांगण्यात आले.


Most Popular News of this Week

राहुल गांधी के बयान के विरोध...

कांग्रेस सांसद राहुल गांधी द्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय...

"विद्यार्थ्यांच्या पाठीशी...

दिल्लीमध्ये NEET परीक्षेसंदर्भात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के उपलक्ष्य में रविवार को असल्फा...

स्वर्गीय अजितदादा पवार...

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त 'अजित स्मृती अवीट...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी...