हैडलाइन

ठाणे जिल्ह्यात प्रथमच आयोजित 'मिनी लोकअदालत' यशस्वी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या परवानगीने ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणांसाठी जिल्ह्यात प्रथमच 'मिनी लोकअदालत' आयोजित करण्यात आली होती.

     या मिनी लोकअदालतीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या दोन पॅनलच्या माध्यमातून एकूण १४९ प्रकरणांत यशस्वी तडजोड घडवून आणत पीडित व त्यांच्या वारसांना १७ कोटी ८० लाख ९६ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

      मागील राष्ट्रीय लोकअदालत ९ मे २०२६ रोजी पार पडली होती, तर पुढील राष्ट्रीय लोकअदालत १२ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. या दोन्ही लोकअदालतींमधील चार महिन्यांचा मोठा कालावधी लक्षात घेता, अपघातातील पीडित व त्यांच्या वारसांना लवकरात लवकर भरपाई मिळावी या उद्देशाने मोटार अपघात दावा न्यायाधीकरणात कार्यरत असलेल्या वकिलांच्या प्रयत्नांतून या मिनी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र एस. पाजणकर यांनी दिली.

      या लोकअदालतीमध्ये मोटार अपघात दावा क्र. १७४२/२०२४ मधील मृत व्यक्तीच्या वारसांना १ कोटी ८० लाख रुपयांची विक्रमी भरपाई मंजूर करण्यात आली. या दाव्यातील मृत व्यक्ती विजयकुमार आदीद्रविदार (वय ३६) हे टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे नर्सिंग विभागात कार्यरत होते. ते मुंबई-गोवा हायवेवरून मोटारसायकलने जात असताना आंबेवाडी नाका (कोलाड, रोहा, जि. रायगड) येथे एका भरधाव ट्रेलरने त्यांना मागून धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

       मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाच्या सदस्य न्यायाधीश आर. व्ही. मोहिते यांच्या न्यायालयातील या दाव्यात जिल्हा न्यायाधीश-०८ माने यांच्या मार्गदर्शनाखाली तडजोड करण्यात आली. यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडतर्फे १ कोटी ८० लाखांचा धनादेश ठाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या हस्ते वारसांना सुपूर्द करण्यात आला.     

       या प्रकरणांमध्ये विमा कंपनीतर्फे ॲड.अरविंद के. तिवारी यांनी तर पक्षकारांतर्फे ॲड. सचिन एल. माने यांनी काम पाहिले.



Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...