हैडलाइन

महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त टिळकनगर येथील लोकमान्य टिळक हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रताप बंडगर यांच्या वतीने करण्यात आले. हा कार्यक्रम चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १५२च्या नगरसेविका आशा मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, अजित पवार यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, वेळेचे काटेकोर नियोजन, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचा उल्लेख केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती साधावी आणि समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठी अशाच प्रकारचे कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.

Most Popular News of this Week

मुंबईतील वृक्षसंपदेचे...

मुंबईतील झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक व सुदृढ अशी वर्गवारी करण्यासाठी...

मुंबईतील वृक्षसंपदेचे...

मुंबईतील झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक व सुदृढ अशी वर्गवारी करण्यासाठी...

देशातील ७५ आणि...

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे...