हैडलाइन

चेंबूरमध्ये महादेव शिगवण यांची परिसर पाहणी; समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे निर्देश

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह तसेच बीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत परिसराची पाहणी केली.


या पाहणीदरम्यान परिसरातील रस्ते दुरुस्ती, अनधिकृत बांधकामे, कचराकुंडी व कचरा व्यवस्थापन, गटारांची स्वच्छता, सार्वजनिक शौचालये तसेच लादीकरणाच्या कामांची पाहणी करण्यात आली.
परिसरातील विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करताना महादेव शिगवण यांनी संबंधित बीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी दुरुस्ती किंवा स्वच्छतेची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी त्वरित सुधारणा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यासोबतच परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी कोणती विकासकामे करता येतील, याबाबतही बीएमसी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली.

नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समजून घेत त्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राहणे गरजेचे असल्याचे यावेळी महादेव शिगवण यांनी स्पष्ट केले.


Most Popular News of this Week

स्वतंत्रता दिवस पर सायन...

देश अपना 80वां स्वतंत्रता दिवस मना रहा है। इसी अवसर पर सायन कोलीवाड़ा...

गोवंडी के VK English High School में...

गोवंडी स्थित VK English High School में 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर ध्वजारोहण एवं...

‘मेरी धारावी, मेरे...

स्वतंत्रता दिवस के मौके पर धारावी के 40 से ज्यादा स्कूलों के 1,000 से अधिक...

नगरसेविका आशा मराठे ने आयोजित...

मुंबई के चेंबूर वार्ड क्रमांक 152 की नगरसेविका एवं प्रभाग समिति अध्यक्ष आशा...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...