हैडलाइन

आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत कॅन्सर तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेले मोफत कॅन्सर तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आरोग्य तपासणी व रक्तदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 या शिबिरात मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग यांची मोफत प्राथमिक तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच कर्करोगासारख्या गंभीर आजाराची प्राथमिक तपासणी उपलब्ध व्हावी, तसेच आजाराचे लवकर निदान होऊन आवश्यक उपचारासाठी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी कॅन्सर तपासणी व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांची आवश्यक तपासणी करण्यात आली. महिला तसेच पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली. कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी नियमित आरोग्य तपासणी, योग्य वेळी निदान आणि आवश्यक उपचार याबाबत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यासोबतच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व असून, नागरिकांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार पंकज भुजबळ यांनी आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. कर्करोगासारख्या आजाराचे वेळीच निदान झाल्यास उपचार करणे अधिक सुलभ होते. त्यामुळे नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामीण रुग्णालय लासलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळकृष्ण अहिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कोशिरे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, डॉ.श्रीकांत आवारे, पांडुरंग राऊत, दत्तात्रय रायते,बालेश जाधव, सचिन दरेकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

भाजपचे मंत्री रमाकांत गुप्ता...

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान’...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...