हैडलाइन

सेवा संकल्प अभियान महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हाभरात व्यापक जनजागृती

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमो धर्म’ या भावनेतून जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’ला सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत  १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, याद्वारे शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत.

शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष सत्र व मार्गदर्शन

या अभियानांतर्गत सखी सेंटर रत्नागिरीमार्फत गोदुताई जांभेकर विद्यालय, एम. एस. नाईक हायस्कूल, आबासाहेब मराठे कला व वाणिज्य महाविद्यालय (हातीवले राजापूर), जागुष्टे हायस्कूल, पुनस हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, माध्यमिक विद्यालय जुवाठी, रत्नागिरी नगर परिषद शाळा क्र. १, यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेज यांसह विविध शाळांमध्ये विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे दुष्परिणाम, मासिक पाळी व्यवस्थापन, कौशल्य विकास, तसेच महिलांचे हक्क व कायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  


लोकाभिमुख उपक्रम आणि स्वाक्षरी मोहीम

रत्नागिरी शहर व परिसरातील भाट्ये, काळबादेवी आणि उद्यमनगर झोपडपट्टी भागातील महिलांसाठी विशेष महिला सक्षमीकरण मेळावे घेण्यात आले. तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी रत्नागिरीचा राजा मंडळ, रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली, ज्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

योजना आणि हेल्पलाइनची प्रभावी माहिती

या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून 'बेटी बचाओ बेटी पढाओ' योजना, सखी वन स्टॉप सेंटर, सखी निवास, महिला समुपदेशन केंद्र, बालसुरक्षा यंत्रणा यांसारख्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जात आहे. तसेच आपत्कालीन मदतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या चाइल्ड हेल्पलाइन (१०९८) आणि महिला हेल्पलाइन (१८१) यांबद्दल तज्ञांमार्फत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले जात असून, या अभियानाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी केले आहे.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

भाजपचे मंत्री रमाकांत गुप्ता...

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान’...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...