हैडलाइन

नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले FIR मागे घ्या, रिया यादव व मुस्कान कन्नौजियाला धमकी देण्याऱ्यांवर कारवाई करा: झीनत शबरीन

'नीट' (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर या तरुणीला सोशल मीडियावर सतत धमक्या मिळत आहेत. पोलिसांकडे तक्रार करूनही धमक्या कमी झालेल्या नाहीत. सरकारविरोधात आवाज उठल्यामुळे रियाला प्रचंड त्रास दिला जात आहे. रियाला धमकी देणाऱ्यांना अटक करावी व आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे गुन्हे रद्द करावेत अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसने केली आहे.


मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस सुरभी द्विवेदी, ॲड. ऋषभ रंजन, हरगुन सिंग यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस सहआयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर झीनत शबरीन म्हणतात की, "आज आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन सह-पोलीस आयुक्त शर्मा यांची भेट घेतली. आम्ही त्यांच्यासमोर दोन मागण्या मांडल्या आणि त्या दोन्ही अत्यंत स्पष्ट आहेत. आमची पहिली मागणी रिया अहिर हिच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरबाबत (FIR) आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील आंदोलनादरम्यान ती युवाशक्तीचे प्रतीक बनली आहे. तिच्याविरुद्ध दाखल झालेला एफआयआर आणि विद्यार्थ्यांवरील इतर सर्व एफआयआर रद्द केले जावेत. रियाला धमक्या दिल्या जात आहेत त्याची पोलिसांनी दखळ घ्यावी. आम्ही या तरुण विद्यार्थ्यांवरील सर्व एफआयआर रद्द व्हावेत अशी मागणी केली आहे."


रिया अहिर आणि मुस्कान कन्नौजिया यांसारख्या महिला 'क्रिएटर्स'ना (content creators) बलात्काराच्या धमक्या देणाऱ्या, ऑनलाइन छळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर खटला चालवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. २७ वर्षीय रिया गेल्या सहा वर्षांपासून अभिनय आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे.तिने २५ तारखेलाच सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार नोंदवली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सह-पोलीस आयुक्तांनी (Joint CP) आश्वासन दिले आहे की, धमक्या देणाऱ्यांची ओळख पटवून कारवाई करू, असे शबरीन यांनी सांगितले.


Most Popular News of this Week

स्वतंत्रता दिवस पर सायन...

देश अपना 80वां स्वतंत्रता दिवस मना रहा है। इसी अवसर पर सायन कोलीवाड़ा...

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

गोवंडी के VK English High School में...

गोवंडी स्थित VK English High School में 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर ध्वजारोहण एवं...

‘मेरी धारावी, मेरे...

स्वतंत्रता दिवस के मौके पर धारावी के 40 से ज्यादा स्कूलों के 1,000 से अधिक...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...