हैडलाइन

भारताच्या आठवणींचा दस्तऐवज’… एस. वाय. कुरैशी यांच्या India and I पुस्तकाचे मुंबईत शानदार प्रकाशन

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या पुस्तकाचा मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये प्रकाशन सोहळा पार पडला.

 या कार्यक्रमाला साहित्य, कला आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अभिनेता आणि सूत्रसंचालक कबीर बेदी यांनी पुस्तकातील उताऱ्यांचे वाचन केले.


तर टीव्ही निर्माते आणि सूत्रसंचालक सिद्धार्थ काक तसेच ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका सुचेता दलाल यांच्यासोबत एस. वाय. कुरैशी यांनी पुस्तकाच्या निमित्ताने विशेष संवाद साधला.

या पुस्तकामध्ये एस. वाय. कुरैशी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील अनुभव, भारतातील विविध घडामोडी आणि आयुष्यातील महत्त्वाच्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. ‘A Hundred Memories, Not a Memoir’ म्हणजेच आत्मचरित्र नसून शंभर आठवणींच्या माध्यमातून भारताचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.

मुंबईतील या प्रकाशन सोहळ्याला साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून एस. वाय. कुरैशी यांच्या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या.


Most Popular News of this Week

‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२७...

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ च्या सामाजिक,...

सहकारी साखर कारखान्यांसाठी...

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी...

लोकनेते आदरणीय गणेश नाईक...

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५...

माजी खासदार समीर भुजबळ...

एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे...

शिवसेना पालघर शहर प्रमुख...

पालघर येथील खासगी रुग्णालयात डॉक्टरांसोबत झालेल्या गैरवर्तनाची शिवसेना...