हैडलाइन

राखीच्या धाग्यातून उमटली आशेची नवी किरणं; माहीमच्या रॉनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसमध्ये महापौर रितू तावडे यांनी चिमुकल्यांसोबत साजरं केलं अनोखं रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला मुंबईतील माहीम येथे असणाऱ्या रॉनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया येथे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या लहान मुलांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी रक्षाबंधन साजरे केले. या विशेष रक्षाबंधन कार्यक्रमात मुंबईच्या महापौर रितू तावडे या देखील सहभागी झाल्या होत्या. या माध्यमातून भाऊ-बहिणीच्या प्रेमासोबतच काळजी, आपुलकी आणि एकजुटीची भावना जपण्यात आली. यावेळी उपचार घेणाऱ्या लहान मुलांनी स्वतःच्या हाताने राख्या बनवल्या होत्या 

रक्षाबंधनाचा हा उत्सव कुटुंबांच्या बांधिलकीचेच प्रतीक ठरला. या सांस्कृतिक कार्यक्रमामधून मिळालेल्या आनंदाच्या क्षणामुळे लहानग्यांना उपचारांमधून काही काळ विरंगुळा मिळाला. या माध्यमातून मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कठीण काळात सकारात्मकता मिळून उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली.


महापौर रितू तावडे यांनी रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस इंडियाला भेट देत तेथील मुलांसोबत आणि कुटुंबीयांसोबत रक्षाबंधन साजरे केल्यामुळे. त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा एक संस्मरणीय अनुभव ठरला. त्यांच्या भेटीमुळे उपचारांच्या या आव्हानात्मक प्रवासात कुटुंबीयांना आपुलकीची भावना मिळाली.

यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की मुंबईसारख्या शहरात रोनाल्ड मॅक्डोनल्ड हाऊस इंडिया यांच्या वतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरजू रुग्णांची सेवा करण्यात येत आहे अत्यंत मोठी गोष्ट आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मदत करण्यात येते. यापुढे देखील गरजू कर्करोग ग्रस्त मुलांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर निधीतून मदत करण्यात येईल.

रॉनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया येथे प्रत्येक उत्सव हा मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनिक स्वास्थ्याला बळ देतो. आनंद, आपुलकी, सकारात्मकता आणि आशेचे क्षण निर्माण करत, उपचारांच्या संपूर्ण प्रवासात कुटुंबांना आवश्यक असलेला आधार आणि काळजी देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो.

 दुर्धर आजारावर मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या लहान मुलांना रॉनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया मध्ये राहण्याची, खाण्याची आणि प्रवासाची मोफत सोय केली जाते. लहान मुलांवर उपचार सुरू असताना त्यांच्या कुटुंबांसाठी उपचाराचा खर्च प्रवास हा न परवडणारा असतो. अनेकदा त्यांच्या मूळ गावापासून शेकडो किलोमीटर दूर आल्यावर आर्थिक अडचण भासते. अशामध्ये रुग्णांना दीर्घकाळ घरापासून व प्रियजनांपासून दूर रहावे लागल्यामुळे त्यांना भावनिक ताण येतो. अशा परिस्थितीत रॉनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया या कुटुंबांना केवळ राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देत नाही, तर सुरक्षित आणि कुटुंबकेंद्री वातावरणही प्रदान करते. रुग्णालयाजवळ मोफत निवास, पौष्टिक आहार, रुग्णालयात ये-जा करण्यासाठी वाहतूक सुविधा, मुलांसाठी मनोरंजन व विविध उपक्रम, भावनिक आणि मानसशास्त्रीय आधार तसेच दैनंदिन जीवनासाठी आवश्यक सुविधाही येथे उपलब्ध करून दिल्या जातात. या माध्यमातून कुटुंबांवरील आर्थिक आणि दैनंदिन व्यवस्थापनाचा ताण कमी करून त्यांना आपल्या मुलाच्या उपचार आणि आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करता येते.



Most Popular News of this Week

शेतकरी अस्मानी व सुलतानी...

मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीकं करपून गेली आहेत. दुष्काळ...

भारत–श्रीलंका वार्षिक...

भारत और श्रीलंका के बीच द्विपक्षीय समुद्री अभ्यास SLINEX-26 का 13वां संस्करण 17 से 21...

शेतकऱ्यांनी विविध शासकीय...

कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत...

शिवसेना मुख्य नेते,...

शिवसेनेच्या मुख्य धारे सोबत पर्यावरण संवर्धन जतन,जनजागृती आणि व्यवस्थापन...

स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी)...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे...

गणेशोत्सवाच्या...

श्रीगणेशोत्सवाच्या काळात मुंबईत नियमित प्रवाशांसोबतच भाविक आणि...