हैडलाइन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नवी मुंबईत क्रीडाजागृतीचा उत्साह; खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्याची निशांत भगत यांची मागणी

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्रीडा व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिक, मैदानी खेळ, शारीरिक तंदुरुस्तीविषयक उपक्रम तसेच मल्लखांबाचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी, नियमित व्यायाम व खेळाचे महत्त्व समजावे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.


कार्यक्रमास ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुवर्णा बारटके, उपआयुक्त (क्रीडा व सांस्कृतिक विभाग), नवी मुंबई महानगरपालिका सौ. अभिलाषा पाटील, क्रीडा समिती सदस्य निशांत भगत, राज्य क्रीडा मार्गदर्शक सौ. मनीषा मानकर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना म्हात्रे तसेच क्रीडा शिक्षक संतोष मुंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी क्रीडा समिती सदस्य निशांत भगत यांनी नवी मुंबईतील खेळाडूंच्या विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. खेळाडूंसाठी आवश्यक क्रीडा मैदाने, प्रशिक्षण सुविधा, क्रीडा साहित्य तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली.


नवी मुंबईतील खेळाडूंना चांगल्या सुविधा व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकतील, असा विश्वासही निशांत भगत यांनी व्यक्त केला. क्रीडा समितीच्या माध्यमातून खेळाडूंच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.


Most Popular News of this Week

शेतकरी अस्मानी व सुलतानी...

मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीकं करपून गेली आहेत. दुष्काळ...

भारत–श्रीलंका वार्षिक...

भारत और श्रीलंका के बीच द्विपक्षीय समुद्री अभ्यास SLINEX-26 का 13वां संस्करण 17 से 21...

शेतकऱ्यांनी विविध शासकीय...

कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत...

शिवसेना मुख्य नेते,...

शिवसेनेच्या मुख्य धारे सोबत पर्यावरण संवर्धन जतन,जनजागृती आणि व्यवस्थापन...

स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी)...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे...

गणेशोत्सवाच्या...

श्रीगणेशोत्सवाच्या काळात मुंबईत नियमित प्रवाशांसोबतच भाविक आणि...