नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने भव्य ‘महा गणेश मूर्ती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी आणि नागरिकांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. या अनोख्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मंदा म्हात्रे, वनमंत्री गणेश नाईक आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.
पीओपीच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे होणारे जलप्रदूषण टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.