हैडलाइन

महापरिनिर्वाण दिनी ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे न येण्याबाबत आवाहन

ग्लोबल पॅगोडा प्रतिनिधी व महानगरपालिकेचे आवाहन

‘कोविड – १९’ च्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पॅगोडा बंद

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन येत्या रविवारी म्हणजेच दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या आर मध्य’ विभागाच्या कार्यक्षेत्रात असणा-या ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे मोठ्या संख्येने अनुयायी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र, ‘कोविड – १९’ या संसर्गजन्य आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२० दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे. तरी, अनुयायांनी दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२० दरम्यान ग्लोबल पॅगोडा येथे येऊ नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ - ७) श्री. विश्वास शंकरवार व ‘ग्लोबल पॅगोडा’चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर - मध्य’ विभाग कार्यालयात विविध संघटनांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. उप आयुक्त (परिमंडळ - ७) श्री. विश्वास शंकरवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला ‘आर मध्य’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, ‘ग्लोबल पॅगोडा’ चे व्यवस्थापक श्री. एस. एस. शिंदे, संबंधित सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) श्री. एस. डी. वडके, वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. एस. एम. नारकर, पदनिर्देशित अधिकारी श्री. गोंधळी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि ‘ग्लोबल पॅगोडा’ चे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

वरीलनुसार आयोजित बैठकी दरम्यान ‘कोविड – १९’ चा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून यावर्षी शनिवार, दिनांक ५ डिसेंबर २०२० ते सोमवार, दिनांक ७ डिसेंबर २०२० या तीन दिवशी ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. तरी, कृपया अनुयायांनी या तीन दिवसांदरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुनच अभिवादन करावे, असे नम्र आवाहन या निमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.


Most Popular News of this Week

ALL INDIA NAU SAINIK CAMP 2026 CONCLUDES AT INS SHIVAJI, LONAVALA

The National Cadet Corps’ flagship annual training camp for Naval Wing cadets, All India Nau Sainik Camp (AINSC) 2026, concluded at INS Shivaji, Lonavala. Organized by NCC Directorate Maharashtra...

महापौर रितू तावडे यांच्यासह...

मुंबईच्या महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, समाजवादी...

एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल...

            नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अर्थात...

जेजुरी मार्गावरील...

 सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून...

भाजपा को ‘वन नेशन, वन पॉलिटिकल...

भारतीय जनता पार्टी संविधान का उल्लंघन करते हुए ईडी, सीबीआई तथा अन्य...

‘लाडकी बहिण’ योजनेवर...

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने असा एकही विभाग अथवा क्षेत्र सोडले नाही जेथे...