राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान : विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला, निशिगंधा वाड, कविता राऊत, पलक मुच्छल सन्मानित

राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान



विशाखा सुभेदारउर्वशी रौतेलानिशिगंधा वाडकविता राऊतपलक मुच्छल सन्मानित


 


मुंबई,दि.27 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदारउर्वशी रौतेला व निशिगंधा वाडधावपटू कविता राऊतपार्श्व गायिका पलक मुच्‍छल यांसह 11 गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.



पुणे येथील सुर्यदत्त समुह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात सुर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले. मातृत्व म्हणजे केवळ आई होऊन बाळाला जन्म देणे नाहीतर मातृत्व म्हणजे सहनशीलताप्रेम व कारुण्यभाव असे सांगताना स्त्रीशक्ती अद्भूत असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.


 मनुष्य कितीही यशस्वी झालासंपन्न झाला व यशवंत झाला तरीही सुख-दुःख प्रसंगी त्याला आईचीच आठवण येतेअसे सांगून मातामातृभाषा व मातृभूमीचे स्मरण ठेवल्यास प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अधिक प्रगती करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.  



यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिस्टर ल्युसी कुरियनडॉ स्वाती लोढाआरती देवॲड. वैशाली भागवततृशाली जाधव तसेच सुर्यादत्ता समूहाच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना देखील सुर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुर्यदत्त संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय चौरडिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ निशिगंधा वाडविशाखा सुभेदार व  वैशाली भागवत यांनी सत्काराला उत्तर दिले. पलक मुच्छल यांनी गीत सादर केले तर उर्वशी रौतेला यांनी गढवाली गाणे गायले.


Most Popular News of this Week

शनिवार को सजेगी हार्मनी...

शनिवार को सजेगी हार्मनी म्यूजिकल की मैफिलग्लोबलचक्र- संध्या...

सनातन संस्था द्वारा देशभर में...

सनातन संस्था द्वारा देशभर में 75 स्थानों पर ‘गुरुपूर्णिमा महोत्सव’...

आधुनिकतावादी एवं और...

हिंदू जनजागृति समिति और राष्ट्रीय वारकरी परिषद की पंढरपुर में...

कर्मचारियों के नाम पर गोल्ड...

कर्मचारियों के नाम पर गोल्ड लोन लेकर अनेको बैंकों के साथ लाखो की ठगी,नकली...

आवश्यक निर्माणों को मालिकाना...

आवश्यक निर्माणों को मालिकाना हक देकर नियमित किया जाए- विधायक गणेश नाईक की...

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह...

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने उपमुख्यमंत्री अजीत पवार को दि जन्मदिन की...