चेंबूर शिवसेना व युवासेना तर्फे ' राष्ट्रीय डॉक्टर दिन' मनपा व खाजगी डॉक्टरांचा सन्मान

चेंबूर शिवसेना व युवासेना तर्फे ' राष्ट्रीय डॉक्टर दिन' मनपा व खाजगी डॉक्टरांचा सन्मान 


मुंबई : ' राष्ट्रीय डॉक्टर दिन' निमित्ताने  चेंबूर शिवसेना व युवासेना तर्फे  मनपा व  खाजगी डॉक्टरांचा सन्मान  करण्यात आला. शिवसेना  शाखा क्र. १५२ व १५४ च्या वतीने तसेच  आमदार .प्रकाश फातर्पेकर व युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुप्रदा प्रकाश फातर्पेकर यांच्या सहकार्याने युवा सेना विभाग अधिकारी सचिन खेतल युवती सेना विभाग अधिकारी  मनाली जुईकर यांच्या मार्गदर्शनाने चेंबूर कॅम्प येथील इनलॅक्स रुग्णालय, पोस्टल कॉलनी येथील माँ मनपा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना तसेच विभागातील सर्व खाजगी डॉक्टरांना सन्मानपत्र, शाल, आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निस्वार्थी रुग्णसेवेचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी चेंबूर विधासभेचे कर्तव्यदक्ष आमदार प्रकाश फातर्पेकर, मितेश पाटिल विभाग चिटणीस विधानसभा समन्वयक दिपेश अशोक चव्हाण, युवा शाखा अधिकारी  अजय रमेश कदम, युवा शाखा अधिकारी  भरत विठ्ठल शिंदे सर्व युवासेना व युवती सेना पदाधिकारी उपस्थित होते. Most Popular News of this Week