मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचा पर्यावरण सौरक्षनासाठी आरे जंगलात हल्ला बोल मोर्चा
मुंबई: गेली अडीच वर्षा पूर्वी मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी मुंबईचा श्वास असणारे आरे जंगलतोड पर्यावरण प्रेमी, आणि आघाडी सरकारने रोखून धरल्याने भाजपा मध्ये झालेली घालमेल आणि सत्तेसाठी झालेली घुसमट ,एकनाथ शिंदे गटाला सोबत घेवून सेनेत केलेली दुफळी,आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून,मुंबईकर नागरिकांचा श्वास असलेल्या आरे जंगलात पुन्हा मेट्रो काराशेड ला परवानगी देण्याचा घातलेला घाट.
या मागचे छलकपट लक्षात घेवून मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आमदार भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा* यांच्या मार्गदर्शनात आज आरे जंगलातील पिकनिक पॉइंट वर संपूर्ण मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपा शिंदे सरकार चा जाहीर निषेध करीत हल्लाबोल केला.
यावेळी शेकडो पदाधिकार्यांनी,जिल्हाध्यक्ष,महिला पदाधिकारी आणि पर्यावरण प्रेमी मुंबईकरांनी या सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.यावेळी दक्षिण मध्या मुंबई काँग्रेस कमिटीचे संघटक सचिव आणि पर्यावरण मित्र तानाजी घाग यांनी या प्रकल्पाला विरोध करताना,आता काय मुंबईचा श्वास पण हिरावून घेणार आहात का? असा सवाल उपस्थित केला.बोरीवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि गोरेगावचे आरे जंगल ही मुंबईची शान तर आहेच परंतु पर्यावरणाचा आत्मा आहे.कोरीनाच्या काळात दोन वर्ष श्वास विकात घ्यावा लागला होता मुंबईकरांना.आता आरेवर घाला घातला तर मुंबईकर जगू शकतील का असा प्रश्न उपस्थित केला.
पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांची ही साद भाजपा शिंदे आघाडीने नाही ऐकली तर जनाप्रक्षोभ वाढेल असे शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी सांगत होते.