हैडलाइन

सोल्जरॅथॉन ३.० : आपल्या सैनिकांच्या सन्मानासाठी १४ ऑगस्ट रोजी धावणार १३ हजारहून अधिक रनर

सोल्जरॅथॉन ३.० : एक अनोखी फ्रीडम रन 

आपल्या सैनिकांच्या सन्मानासाठी १४ ऑगस्ट रोजी धावणार १३ हजारहून अधिक रनर 



मुंबई: सीमेवर आपले प्राण पणाला लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या लाखो सैनिकांच्या सन्मानासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी फिटिस्तान - एक तंदुरुस्त (फिट) भारत यांच्यातर्फे रविवारी, १४ ऑगस्ट २०२२ रोजी सोल्जरॅथॉन ३.० या अनोख्या फ्रीडम रनचे  देशभरात आयोजन करण्यात येणार आहे. 
सोल्जरॅथॉन ३.० या रनचे वैशिष्ट्य म्हणजे रनमधील प्रस्तावित ७.५ किलोमीटर अंतर ७५ मिनिटांमध्ये पायी चालत किंवा सायकलने (सायकलिंग) पार कारायचेबआहे. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून देशातील ११५ ठिकाणी एकाच वेळी फ्रीडम रन होणार आहे. संरक्षण दलाच्या गौरवार्थ होणाऱ्या रनमध्ये १३,१३८ रनर धावणार आहेत. त्यात अधिकाधिक लष्करी अधिकारी आणि सैनिकांचा समावेश आहे. 

फिटिस्तान - एक तंदुरुस्त (फिट) भारत उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हौशी आणि व्यावसायिक रनर आपापल्या समुदायासोबत (कम्युनिटी) त्यांच्या सोयीनुसार, या रनमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांची रन ही एकतर ७.५ किमी अंतराची किंवा ७५ मिनिटांची असेल. सहभागींना त्यांच्या इच्छेनुसार, रन पूर्ण करता येणार आहे. फ्रीडम रन ही पायी चालतही पूर्ण करता येईल. चालणाऱ्यांना जॉगिंग किंवा धावण्याची गरज नाही. इतकेच नव्हे तर सायकलिस्ट या रनमध्ये भाग घेऊ शकतात. 

सोल्जरॅथॉन ३.० या फ्रीडम रनला १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता देशभरातून एकाच वेळी सुरुवात होईल. रनसाठी आवश्यक संपूर्ण गोष्टी, जसे पदक, टी-शर्ट आणि अन्य उपाययोजना सोल्जरॅथॉन टीमकडून पुरवल्या जातील.
फिटिस्तान या कम्युनिटी उपक्रमाची स्थापना मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया (स्पेशल फोर्समधील माजी अधिकारी) आणि शिल्पा भगत (माजी मिसेस इंडिया वर्ल्ड) यांनी मिळून केली आहे. या उपक्रमाद्वारे तंदुरुस्त (फिट) राहण्यासाठी इच्छा असणे आणि वस्तुस्थिती यांतील फरक भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

देशासाठी प्राणाची आहुती देणारे वीर जवान आणि जखमी सैनिकांचा सन्मान करणे, हे सोल्जरॅथॉनचे प्रमुख लक्ष्य आहे. ही रन यशस्वीपणे राबविण्यासाठी देशातील ३६हून अधिक शहरांमध्ये ५१ फिटिस्तान कॅप्टन विखुरलेले आहेत. त्यात अजमेर, अकोला, भिलाई, रायपूर, हकीमपेट, भुसावळ, सिकर, जोधपूर, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई आदी शहरांचा समावेश आहे. 

सोल्जरॅथॉन ३.० या फ्रीडम रनमध्ये सहभाग नोंदवलेले लष्करी अधिकारी, जवान पुढीलप्रमाणे :  
●लष्करी सेवा (आर्मी, एअर फोर्स, नेव्ही, एनसीसी, आयटीबीपी, सीआरपीएफ)- ८६६७. 
● एकूण नागरिक : ४४७१. 
● फिट भारत कॅप्टन्स अंतर्गत - ३९६०. 
● फिट भारत कॅप्टन्स यांच्या पेक्षाही वेगळे नागरिक - ५११. 
● एकूण - १३, १३९ रनर. एकूण ठिकाणे (लोकेशन्स) - ११५. 


मुंबईतील रनची सुरुवात एटी मंदिरापासून

सोल्जरॅथॉन ३.० अंतर्गत मुंबई रन ही अशोक टॉवर, परळ येथे संपेल. रनची सुरुवात एटी मंदिरापासून होईल. 

या फ्रीडम रनसह विजय दिवसाचे औचित्य साधून १६ डिसेंबर रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या आगामी रन मध्ये एक लाखांहून अधिक धावपटू सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. १९७१मध्ये पाकिस्तानला हरवून भारताने बांगलादेशची निर्मिती केली. तो दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 

तेव्हा आता आणि यापुढे तुमच्या इच्छेनुसार फिट इंडियन बनण्यासाठी तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. सोल्जरॅथॉन ३.० या फ्रीडम रनच्या माध्यमातून आपल्या लष्करी जवानांना मानवंदना देण्यासाठी एक अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा! 



Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...