मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी अन्यायग्रस्तांचा प्रयत्न..
धुळे - शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज होत आहे. दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान येथे हा कार्यक्रम होत आहे..
याठिकाणी उपस्थित नागरिक व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या १९ विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात आले आहे.....
मात्र आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी अनेक पिढीतांनी संधी साधत या उपक्रमात आलेल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे....
तर डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे एका खाजगी रुग्णालयात बाळाच्या आईचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत पिढीताने मुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा यावेळी प्रयत्न केला आहे..
तर गेल्या दोन वर्षापासून न्याय मिळत नसल्याची व्यथा सुभाष काशिनाथ सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. त्यामुळे या बाळाच्या आईला न्याय मिळेल का? असा सवाल उपस्थित करत त्यानी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न त्या लहान चिमुकल्यासह केला आहे...... ....
जर बाळाच्या आई ला न्यान मिळणार नसेल तर मुख्यमंत्री यांनी या बाळा ल दत्तक घ्यावं अशी मागणी या वेळी करण्यात आली...