हैडलाइन

स्व. दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ, घाटकोपर (पंतनगर) यांच्या वतीने वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या दिवेश अवधूत हडकर याचा मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप देऊन गौरव करण्यात आला. स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे लॅपटॉप देऊन सत्कार करण्यात आला.

घाटकोपर पंतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनाला भांडुप प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी दिवेश अवधूत हडकर याला लॅपटॉप भेट देऊन त्याच्या शैक्षणिक यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे लॅपटॉप देऊन हा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने पुढे नेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे जग झपाट्याने बदलत असून या बदलत्या काळात शिक्षणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षणामुळे व्यक्तीचा पाया भक्कम होत असून समाजाच्या प्रगतीसाठीही शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर देऊन पुढील पिढीलाही त्याचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भविष्यातही अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Most Popular News of this Week

सनातन संगम: एकमत्व का उत्सव...

भव्य सामुदायिक समारोहसनातन संगम: एकमत्व का उत्सव वसंत ओएसिस बीएमसी...

स्व. दिना बामा पाटील...

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ, घाटकोपर (पंतनगर) यांच्या वतीने...

स्वामी समर्थांच्या प्रकट...

भांडुप पश्चिम येथील माता रमाबाई नगर आणि साई हिल परिसरात श्री स्वामी समर्थ...

महापौर श्रीमती रितू तावडे...

मुंबई महानगरातील प्रमुख नाले व लहान नाले यातून गाळ काढण्‍याची सर्व कामे...

घाटकोपरमध्ये ‘छत्रपती...

शासनाच्या विविध सेवा सामान्य नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद पद्धतीने...

मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या...

मुंबई शहर उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून पालिकेच्या...