हैडलाइन

महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची २०० वी जयंती तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३५ वी जयंती देशभर साजरी केली जाणार आहे. त्यामुळेच समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मुल्यांवर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या महामानवांचे कार्य व विचार घेऊन काम करत आहे. म्हणून पक्षाच्यावतीने राज्यभर संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे जयंती साजरी केली जाणार आहे. 


प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे त्याठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करतील तर पक्षाच्या कार्यालयात दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात येईल तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा, तालुका, शहर व गाव स्तरावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. 

महामानवांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी व्याख्यान, परिसंवाद, किंवा विचारमंथन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.


Most Popular News of this Week

संसदीय गटनेते डॉ श्रीकांत...

मुंबई, ता. 6 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात राबविल्या जाणाऱ्या...

बालचित्रकला स्पर्धा म्हणजे...

माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे...

महात्मा ज्योतिबा फुले आणि...

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न...

सलग ५ तास चाललेल्या संयुक्त...

मुंबई महानगरात सुरू असलेली रस्ते काँक्रिटीकरण कामे, महानगरपालिकेच्या...

गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग...

नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला आज एक...

मुंबई युवक काँग्रेसच्या...

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. वर्षाला २...