हैडलाइन

संसदीय गटनेते डॉ श्रीकांत शिंदे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

मुंबई, ता. 6 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात राबविल्या जाणाऱ्या मतदार यादी सखोल फेरतपासणी (एसआयआर) कार्यक्रमासाठी शिवसेना पक्ष सज्ज झाला आहे. त्याचाच भाग म्हणून, शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या 2 लोकसभांमधील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी सायंकाळी पार पडली. सायनच्या मानव सेवा संघात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला शिवसेना सचिव सचिन जोशी, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मनिषा कायदे, आमदार तुकाराम काते, आमदार दिलीपमामा लांडे, माजी आमदार सदा सरवणकर, प्रवक्ते राजू वाघमारे, यांसह विभागप्रमुख, नगरसेवक, महिला पुरुष व युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या बैठकीत डॉ श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत एसआयआर कार्यक्रमाबाबत माहिती दिली. या उपक्रमाच्या अंतर्गत होणाऱ्या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होऊन अवैध मतदारांना यादीतून वगळण्यासाठी आणि यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आयोगाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केले. यासाठी संघटनेत बीएलए म्हणून मतदार यादीनिहाय नेमणुका करण्याचे आदेशही त्यांनी दिले. अशाच रितीने संपूर्ण महाराष्ट्रात आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटनांना बळकट करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी झपाटून काम करण्याचे आवाहनही डॉ.श्रीकांत शिंदे त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. या बैठकीदरम्यान संसदीय गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर बाबूभाई भवानजी आणि धारावीतील प्रभाग क्रमांक 143 मधून प्रशांत वल्लम, प्रभाग क्रमांक 144 मधून अभय पाठक आणि सचिन मोहिते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.



Most Popular News of this Week

मैत्री पार्क एस.टी. स्टँड...

चेंबूरमधील मैत्री पार्क एस.टी. स्टँड स्थलांतराच्या विरोधात सुरू असलेले...

‘मुंबई महापौर चषक इनडोअर...

दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट्स टर्फवर...

Chembur Gymkhana Shines as Maharashtra’s Billiards Powerhouse

Chembur Gymkhana etched its name in glory by emerging victorious in the prestigious Nestlé–BSAM Billiards League 2026, a tournament organized under the Billiards & Snooker Association of...

मुंबई महापौर चषक इनडोअर...

मुंबई : दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन...

"मातंग समाजाच्या प्रगतीसाठी...

चेंबूर येथे मांग गवंडे उत्कर्ष संस्था यांच्या वतीने मातंग समाजाच्या विकास...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या यशस्वी...