हैडलाइन

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे स्पष्ट निर्देश

‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्वच्छतेची दृश्यमानता (Visibility) वाढविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागाने (वॉर्ड ऑफिस) आपापसातील तसेच इतर प्राधिकरणांशी परस्पर समन्वय वाढवावा. यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री आणि कुशल मनुष्यबळाचा योग्य वापर करून मुंबईतील प्रमुख रस्ते-महामार्ग, त्याभोवतीचा परिसर, दुभाजक स्वच्छ ठेवावेत. मोकळ्या जागांवरील बांधकाम राडारोडा तात्काळ हटवून मुंबईचे सौंदर्य वाढविण्यास प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. 

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, के दक्षिण या प्रशासकीय विभाग अंतर्गत धर्मशाळा चौकी, शासकीय तंत्रनिकेतन (खेरवाडी, वांद्रे पश्चिम) समोर सुरू असलेली रस्त्यांची स्वच्छता, पश्चिम द्रुतगती महामार्ग, चर्चरोड मरोळ सेक्शन रस्ता चौकी, अंधेरी पूर्व येथील गुरू गोविंदसिंगजी मार्गावरील वाहनतळ, जे. बी. रोड मेट्रो स्टेशन चौकी, चर्चरोड मरोळ अंधेरी पूर्व येथील सावित्रीबाई फुले उद्यान येथे आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.


वांद्रे (पश्चिम) येथील धर्मशाळा चौकी येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरीपट तपासले. स्वच्छतेसाठी आधुनिक वाहने किती आहेत, स्वच्छतेचे दैनंदिन कामकाज कसे चालते, यासाठी दररोज किती कामगार हजर असतात, याची सखोल चौकशी केली. महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात सकाळच्या स्वच्छतेवर अधिक भर देणे गरजेचे आहे. यासोबतच रस्ते दुभाजक, चौक तसेच रस्त्यांच्या कडेला व मोकळ्या जागांमधील राडारोडा उचलून कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावण्यात यावी. मुंबईतील रस्त्यांवर उघडपणे दिसणारा कचरा उचलण्यासाठी परिमंडळांतील उप आयुक्त, प्रशासकीय विभागांतील सहायक आयुक्त यांनी दररोज पहाटे घनकचरा व्यवस्थापन चौक्यांना प्रत्यक्ष भेट देवून स्वच्छतेच्या कामांची खातरजमा करावी, असे निर्देश आयुक्त भिडे यांनी दिले.

मुंबई क्लीन लीगमध्ये रहिवासी संकूल, वाणिज्य संकुलांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा. मुंबई क्लीन लीगमध्ये स्वच्छतेच्या निकषांवर सर्व सहायक आयुक्तांचे मूल्यमापन करण्याचे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून सर्व सहायक आयुक्तांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी आपापल्या विभागातील (शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे) सहायक आयुक्त, अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासह वेळोवेळी त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करावे, असे निर्देशही आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.   


अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरा

‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे कुशल मनुष्यबळ आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. त्याचा सुयोग्य वापर करून मुंबई अधिक स्वच्छ ठेवण्यावर भर देणे गरजेचे आहे. एखाद्या ठिकाणचा कचरा उचलल्यानंतर ती जागा लगेच स्वच्छ करा. यासाठी प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करायला हवेत. तसेच नागरिकांमध्येही स्वच्छतेविषयी जनजागृती करा. यासाठी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा, असेही त्यांनी सांगितले. 

नोटीस बजाविण्याचे निर्देश

मुंबईत विविध प्राधिकरणांकडून पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मात्र या कामांसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांकडून कामाच्या ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जात नसतील, बांधकाम साहित्य अनेक दिवस पडून राहत असेल, तर अशा कंत्राटदारांना तात्काळ नोटीस बजाविण्याचे निर्देश भिडे यांनी दिले. 

स्वच्छतेच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमा

आधुनिक स्विपिंग मशीनद्वारे मुंबईतील रस्ते स्वच्छ केले जात आहेत. अशा रस्त्यांची स्वच्छता होत असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाज योग्य होण्यावर भर द्यावा. तसेच प्रत्येक रस्ता आठवड्यातून एकदा स्वच्छ धुतला जावा. पश्चिम दृतगती महामार्गावर सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचे निर्देश भिडे यांनी दिले. 


मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांची

मुंबई महानगराचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी पालकसंस्था या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत. सकारात्मक दृष्टीकोन वाढवून शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करायला हवे. नागरिकांचे प्रबोधन करून त्यांचा सहभाग वाढवा. लोकप्रतिनिधींना सोबत घ्या. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून मुंबईकरांची प्रत्येक दिवसाची सकाळ अधिक सुंदर करण्यावर भर द्या, अशा शब्दांनी आयुक्त अश्विनी भिडे यांनी महानगरपालिका आधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील कामाचा हुरुप वाढविला. या पाहणी दौऱ्यात उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  किरण दिघावकर, उप आयुक्त (परिमंडळ ३)  विश्वास मोटे, सहायक आयुक्त मृदुला अंडे, सहायक आयुक्त दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त नितीन शुक्ला आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयुक्तांचे हस्ते वृक्षारोपण

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून मरोळ चर्च रोड (अंधेरी पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले उद्यानात महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते आज चाफ्याचे रोपटे लावण्यात आले. 



Most Popular News of this Week

बांद्रा गरीब नगरमध्ये मोठी...

मुंबईतील बांद्रा पूर्व परिसरातील गरीब नगर येथे सध्या सुरू असलेल्या...

Chembur Gymkhana Shines as Maharashtra’s Billiards Powerhouse

Chembur Gymkhana etched its name in glory by emerging victorious in the prestigious Nestlé–BSAM Billiards League 2026, a tournament organized under the Billiards & Snooker Association of...

मुंबई महापौर चषक इनडोअर...

मुंबई : दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन...

शिवाजी पार्क येथे रंगणार...

मुंबईकर क्रिकेटप्रेमींना आता पारंपरिक क्रिकेटसोबतच वेगवान, आक्रमक आणि...

शिवाजी पार्क येथे रंगणार...

मुंबईकर क्रिकेटप्रेमींना आता पारंपरिक क्रिकेटसोबतच वेगवान, आक्रमक आणि...

MSEDCL व पोलीस प्रशासन बैठकीत...

नवी मुंबईच्या वाशी-सानपाडा येथील प्रभाग क्र. १८ मधील वाशीगाव, सेक्टर ३१, ३१...