भाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये एक स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे महापौर आणि 'जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांच्या सौजन्याने शहरात 'मोफत हेल्मेट वाटप' भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १८ मे २०२६ रोजी पार पडलेल्या या उपक्रमाला वाहनचालकांचा आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार प्रशांत ठकार, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले. जनतेच्या सुरक्षिततेशी निगडित असलेला हा उपक्रम राबवून आयोजकांनी समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, नगरसेवक परेश ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, गजानन घाडघे, नगरसेवक अजय बहिरा, सुमित झुंझारराव, सुनील बहिरा, माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी शिवनेकर, उमेश इनामदार, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.