हैडलाइन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने दिल्लीला रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यासाठी खाजगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानातून करण्याचा निर्णय घेतला. ते एअर इंडियाच्या प्रवासी विमानाद्वारे मुंबईहून दिल्लीला रवाना झाले.

यावेळी शिंदे यांचे मुंबई विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. तर काहींनी त्यांना भेटून आपले निवेदन त्यांच्या हाती दिले. या सर्वांना भेटून त्यांचे अभिवादन स्वीकारत शिंदे यांनी आपले विमान गाठले. 

केंद्रीय नगरविकास विभागाच्या वतीने दिल्लीत स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० ची विशेष आढावा बैठक आज आणि उद्या दिल्लीत आयोजित केली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी शिंदे  दिल्लीला रवाना झाले. ते स्वतः या बैठकीत सहभागी होणार आहेत. एरवी खाजगी विमानाने प्रवास करणाऱ्या शिंदे यांनी यावेळी मात्र सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे प्रवासी विमानाने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. 

जागतिक बाजारपेठेत तेलाचा किंमती वाढल्याने भविष्यातील धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचा संदेश दिला होता. या संदेशाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी देशातील आपल्या राजकीय सहकाऱ्यांनाही केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत विशेष बैठक घेऊन राज्यातील सर्व मंत्र्यांसाठी नियमावली जाहीर केली होती. 

यानंतर शिंदे यांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी तत्काळ ईव्ही गाडी वापरण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या देखील कमी केली. त्याचप्रमाणे हेलिकॉप्टरने होणारे आपले दौरे देखील कमी केले असून, आता तर खाजगी विमानाने प्रवास न करता एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने प्रवास करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचे पालन करण्यात उपमुख्यमंत्री शिंदे कोणतीही कसूर बाकी ठेवत नाहीत हेच त्यांचा या छोट्याशा कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


Most Popular News of this Week

संजीव उपाध्याय यांची...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी मुंबई विभागीय...

मुसळधार पावसाच्या...

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई...

मुसळधार पावसामुळे निर्माण...

गेल्या दोन ते तीन दिवसा पासून मुसळधार पावसामुळे विभागात अनेक ठिकाणी झाडे...

चीनचा अरुणाचल प्रदेशातील...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अरुणाचल...

'स्टार्टअप फ्रंटियर 1.0'मध्ये...

राज्यातील स्टार्टअप संस्कृतीला नवी दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के विधानसभा मुख्य सचेतक चेतन तुपे ने...