हैडलाइन

महापौरांच्या उपस्थितीत युवकांसाठी रोजगाराची दारे खुली; प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सायन कोळीवाड्याचे आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांच्या पुढाकारातून वीर सावरकर चरित्र चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कौशल्य विकास अंतर्गत मोफत प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण आणि भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मुंबईतील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांतील मोफत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांनी कौशल्याधारित शिक्षणाचा लाभ घेऊन आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले. तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

पालघर के शहीद संतों के...

पालघर में विगत वर्षों शहीद हुए संतों के परिजनों को आज तक कोई सरकारी मदद नहीं...

अनुदानित गॅस सिलेंडर ९ वरून ४...

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...