हैडलाइन

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होईल- रितू तावडे

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होईल. जनतेची कामे आणि आधीच नियोजित असलेल्या महत्त्वाच्या बैठका खोळंबून राहू नयेत, यासाठी मी पूर्वलक्षित कार्यक्रमानुसार महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहून बैठकांना हजेरी लावली. माझ्यासाठी कर्तव्याला नेहमीच पहिले प्राधान्य आहे आणि राहील.

अशा गंभीर आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ आणि योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षित आहे आणि ते करतही आहेत. 

माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने माझे वाहन, कार्यालयीन दालन आणि वैयक्तिक सुरक्षा बाबतची योग्य ती कायदेशीर व तांत्रिक कार्यवाही प्रशासन त्यांच्या पातळीवर चोखपणे करेल, याचा मला विश्वास आहे.

व्यक्तिशः मी अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना मुळीच घाबरत नाही. यापूर्वीही बांगलादेशी फेरीवाले आणि इतर अनधिकृत प्रकरणांवर कारवाई करताना काही घटकांनी माझ्यावर दबाव आणण्याचा आणि मला डगमगवण्याचा प्रयत्न केला होता. पण मी अशा दबावासमोर कधीही झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही. मुंबईकरांच्या हितासाठी माझे काम नियमितपणे सुरू राहील.

केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतरही काही शहरांच्या महापौरांना अशाच प्रकारच्या धमक्या आल्याचे मला समजले आहे. हे एक कटकारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  मात्र, राज्याच्या गृह खात्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ते या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून योग्य ती कडक कारवाई निश्चित करतील.

प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आपले काम करत आहे आणि मी माझे जनसेवेचे व्रत सुरूच ठेवेन. अशा धमक्यांमुळे मुंबईच्या विकासाचा आणि सुरक्षेचा वेग मंदावणार नाही.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...

VJTI वसतिगृहातील नरकयातना आणि...

​महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित व ऐतिहासिक 'वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान...

अंगणवाडी सेविकेच्या...

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी अंगणवाडीत १८ वर्षांपासून...

सायबर गुन्हेगारांना...

मुंबईतील सायबर फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करताना दक्षिण विभाग सायबर...