हैडलाइन

मुंबई-ठाणे पत्रकार संघटनेला नवे नेतृत्व; नियुक्ती मेळावा उत्साहात संपन्न

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई-ठाणे कमिटी नियुक्ती व स्नेहमेळावा कार्यक्रम पार पडला.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित या कार्यक्रमाला पत्रकार, डिजिटल मीडिया प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी मुंबई आणि ठाणे कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अर्धापूरकर, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल महाभाये, विभागीय सचिव दीपक केंकरे आणि विभागीय उपाध्यक्ष विशाल परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तसेच डिजिटल युगातील पत्रकारितेची बदलती दिशा, पत्रकारांसमोरील आव्हाने आणि संघटनात्मक बळकटी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

मुंबई-ठाणे कमिटीतील नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Most Popular News of this Week

मुंबईतील वृक्षसंपदेचे...

मुंबईतील झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक व सुदृढ अशी वर्गवारी करण्यासाठी...

मुंबईतील वृक्षसंपदेचे...

मुंबईतील झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक व सुदृढ अशी वर्गवारी करण्यासाठी...

देशातील ७५ आणि...

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे...