हैडलाइन

कोविडनंतर रोजगार गमावलेल्या डबेवाल्यांना टॅक्सी परवाना व बिनव्याजी कर्ज देणार – प्रविण दरेकर

मुंबई मध्ये गेली १३५ वर्ष डबेवाला कामगार वर्ग काम करतो आहे. परंतू कोव्हिड व लॅाकडाऊन नंतर डबे पोहचवणे या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.. लॅाक डाऊन नंतर हा व्यवसाय कमी झाला. तसेच अनेक ॲानलाईन फुड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या आल्या त्याचा फटका डबेवाल्यांना बसला आहे.. लॅाक डाऊन आधी साधारण पणे पाच हजार डबेवाले कामगार होते. ते आज सातशे/आठशे राहीले आहे.. अनेक डबेवाल्या कामगारांचा रोजगार गेला आहे. या पार्श्व भूमीवर “ मुंबई डबेवाला असोसिएशन “ च्या शिष्ट मंडळाने आज आमदार प्रविण दरेकर यांची बांद्रा कार्यालयात भेट घेतली आणि त्यांना विनंती केली. ज्या डबेवाला कामगारा कडे वाहन चालवण्याचा परवाना आहे त्या डबेवाला कामगाराला “ देवाभाऊ सहकार टॅक्सी “ सेवा योजनेत प्राधान्य द्यावे की जेणे करून त्याला काही ना काही रोजगार मिळेल. डबेवाल्या कामगारांचा मुंबई मधील रोजगार जरी गेला तरी “देवाभाऊ सहकार टॅक्सी “ सेवे मुळे त्याला पुन्हा मुंबई मध्ये रोजगार मिळू शकतो .. तरी डबेवाला कामगार एक मराठी माणुस म्हणुन डबेवाला कामगारांना प्राधान्याने टॅक्सी परमिट द्यावे व योग्य व्याज दरात कर्ज उपलब्ध करून टॅक्सी मिळवून द्यावी .. अशी विनंती केली..

प्रविण दरेकर यांनी शिष्ट मंडळाला आश्वस्त केले, मी तुमच्या सोबत आहे. काही काळजी करू नका ज्यांचे कडे वाहन परवाना आहे त्यांना आम्ही गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देऊ म्हणजे शासनाच्या विविध महामंडळा मार्फत व्याज भरले जाईल. ज्यांचे कडे वाहन परवाना नसेल तर त्याला आम्ही वाहन परवाना काढायला मदत करू .. तुम्हाला आवश्यक ती सर्व मदत माझे कडून केली जाईल.

डबेवाला कामगार हा मराठी माणूस आहे कोविड लॅाकडाऊन मुळे त्याचा रोजगार कमी झाला .. अशा संकट समयी आमदार प्रविण दरेकर यांचे माध्यमातुन डबेवाला कामगाराला नविन क्षेत्रात रोजगार मिळतो आहे याचा आनंद आहे आम्ही आमदार प्रविण दरेकर यांचे आभारी आहोत.




Most Popular News of this Week

भक्ति, संगीत और उत्साह से सजी...

मुंबई के Alberione Hall, St. Paul's College & Media Complex, Bandra West में वरिष्ठ नागरिकों के लिए "Bhajan Jamming Evening" का...

ALL INDIA NAU SAINIK CAMP 2026 CONCLUDES AT INS SHIVAJI, LONAVALA

The National Cadet Corps’ flagship annual training camp for Naval Wing cadets, All India Nau Sainik Camp (AINSC) 2026, concluded at INS Shivaji, Lonavala. Organized by NCC Directorate Maharashtra...

महापौर रितू तावडे यांच्यासह...

मुंबईच्या महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, समाजवादी...

एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल...

            नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अर्थात...

जेजुरी मार्गावरील...

 सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून...

भाजपा को ‘वन नेशन, वन पॉलिटिकल...

भारतीय जनता पार्टी संविधान का उल्लंघन करते हुए ईडी, सीबीआई तथा अन्य...